Vivo ने भारतात लाँच केले नवे ट्रू वायरलेस इयरफोन्स, जाणून घ्या किंमत आणि खासियत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वीवोने भारतात ट्रू वायरलेस इयरबड्स लॉन्च केले आहेत. मार्केटमध्ये सध्या अ‍ॅपल इयरपॉड्ससारखे दिसणार्‍या इयरफोन्सची संख्या वाढली आहे. शाओमी आणि रियलमीसह अनेक स्मार्टफोन मेकर्सने नुकतेच अशाप्रकारचे इयरफोन्स लाँच केले आहेत.

वीवो टीडब्ल्यूएस निओ दोन कलर व्हेरिएंट्स – मूनलाइट व्हाइट आणि स्टारी ब्लूसोबत लाँच केले आहे. याची किंमत 5,990 रुपये आहे. याची विक्री भारतात 24 जुलैपासून सुरू होत आहे.

भारतात वीवोच्या या इयरफोन्सला शाओमी आणि रियलमीच्या इयरफोन्सने मोठी टक्कर मिळेल. डिझाइनबात बोलायचे तर दिसण्यास हे त्या इयरफोन्सपेक्षा थोडे वेगळे जरूर आहेत, परंतु पॅटर्न एकसारखाच आहे.

वीवोच्या इयरबड्समध्ये 14.2एमएमचे डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. हे ब्लूटूथ व्ही 5.2 सपोर्ट करतात. कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये क्वालकॉम अपटेक्स ब्लूटूथ कोडेकचा सपोर्ट दिला आहे. चांगल्या ऑडियोसाठी यामध्ये कंपनीने डीपेक्स स्टिरिओ साऊंड इफेक्ट्स दिला आहे.

डिपेक्स वीवोचीच टेक्नॉलजी आहे, जी कंपनी आपल्या स्मार्टफोन्समध्ये देते. कंपनीने म्हटले की, याची बॅटरी एएसी एनकोडिंगसह 5.5 तासांचा बॅकअप देईल, तर अपटेक्स कोडेकसह यास लागोपाठ 4.2 तास चालवू शकतो.

कंपनीनुसार हे इयरबड्स वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ट आहेत आणि यास आयपी 54 रेटिंग मिळाले आहे. वीवोने दावा केला आहे की, यासोबत दिलेल्या चार्जिंग केसची बॅटरी 22 तास चालेल. ती चार्ज करण्यासाठी युएसबी टाइप सी पोर्ट दिला आहे.