Vodafone idea चा सर्वात स्वस्त दररोज 1GB डाटा आणि फ्री कॉलिंगचा प्लॅन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्यापैकी अनेक लोकांकडे वोडाफोनचे सिम कार्ड असेल. अनेक लोक वोडाफोन आयडियाच्या एजीआरच्या थकीत रक्कमेमुळे चिंतेत असतील की, कंपनीने एजीआर भरले नाही तर कंपनी बंद होईल, परंतु असे होणार नाही. तुमची सेवा सुरू राहणार आहे. सर्वच कंपन्यांनी आपले प्री-पेड प्लान महाग केले आहेत. परंतु, तुम्हाला रिचार्ज तर करावेच लागणार आहे. आम्ही तुम्हाला वोडाफोन आयडियाच्या 5 बेस्ट आणि स्वस्त प्लानबाबत माहिती देणार आहोत, ज्यांच्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डाटासुद्धा मिळेल.

199
वोडाफोन आयडियाजवळ 199 रुपयांचा प्लान आहे, ज्यामध्ये 24 दिवसांची वैधता मिळते. या प्लानअंतर्गत रोज 1 जीबी डाटा मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. सोबतच जी5 अ‍ॅपचे सब्सक्रिप्शनसुद्धा मिळेल.

219
या प्लानमध्ये सुद्धा रोज 1 जीबी डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. यात सुद्धा जी5 अ‍ॅप आणि वोडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन मिळेल.

249
या प्लानची सर्वात मोठी खास बाब म्हणजे यातमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा मिळत आहे. परंतु यात डबल डाटा ऑफर मिळत आहे. ज्यात रोज 1.5 जीबी+1.5 जीबी म्हणजे एकुण 3 जीबी डाटा मिळेल. या प्लानमध्ये सुद्धा रोज 100 मेसेज, जी5 अ‍ॅप आणि वोडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन मिळेल.

299
वोडाफोन आयडियाच्या 299 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसापर्यंत रोज 2 जीबी डाटा मिळेल. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आहे. आणि रोज 100 मेसेजिंगशिवाय जी5 अ‍ॅप आणि वोडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन मिळेल.

398
या प्लानमध्ये 28 दिवसांपर्यंत रोज 3 जीबी डाटा मिळेल. याशिवाय प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लानमध्ये सुद्धा जी5 अ‍ॅप आणि वोडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन मिळेल.