Vodafone घेऊन आलंय 3 नवे डबल डाटा प्लॅन, मिळणार अनेक फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी Vodafone ने अलीकडेच आपल्या ९ सर्कल्स मध्ये डबल डेटा ऑफरला बंद करण्याची घोषणा केली, ज्यामुळे युजर्स नाराजही झाले आहेत. तर आता व्होडाफोन युजर्ससाठी एक गुड न्यूज असून कंपनीने तीन नवीन डबल डेटा ऑफर सादर केल्या आहेत. यात युजर्स दिवसाला 4GB डेटाचा फायदा घेऊ शकतात. या प्लॅनसह इतर अनेक फायदे देखील दिले जाणार आहेत. जाणून घेऊया डबल डेटा प्लॅन्सची किंमत आणि त्यासह मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल…

व्होडाफोनच्या वेबसाइटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार, आता युजर्स २९९, ४४९ आणि ६९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह डबल डेटा ऑफरचा फायदा घेऊ शकतात. या व्यतिरिक्त प्लॅनसह युजर्सना Vodafone Play आणि Zee5 चे विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटाऐवजी आता 4GB डेटा दररोज मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात असून प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.

त्याचबरोबर ४४९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे आणि 2GB+2GB म्हणजेच 4GB डेटा दररोज यात देण्यात येत आहे. तसेच प्लॅनसह अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या व्यतिरिक्त कंपनीच्या तिसर्‍या प्लॅनची किंमत ६९९ रुपये असून त्याची वैधता ८४ दिवसांची आहे आणि यात 4GB डेटाचा दिवसाला फायदा घेऊ शकता.

तीन नवीन प्लॅन ऍड झाल्यावर व्होडाफोन युजर्स एकूण पाच प्रीपेड प्लॅन्ससह डबल डेटा ऑफरचा फायदा घेऊ शकतात. पण डबल डेटा असणारे प्लॅन्स काही निवडक सर्कल्स मध्येच उपलब्ध आहेत. या सर्कल्स मध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकत्ता, पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम, राजस्थान आणि जम्मू-कश्मीर शामिल आहे.