Wakad Crime | ‘तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे रोज 50 पोलीस येतात, महिला पोलिसासोबत हुज्जत’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र यावेळी वाहन चालक आणि पोलिसांमध्ये वाद होण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना वाकड (Wakad Crime) येथील रहाटणी येथे घडली आहे. विनामास्क दुचाकीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला महिला पोलिसाने अडवून पावती करण्यास सांगितले. याचा राग आल्याने दुचाकीस्वाराने महिला पोलिसासोबत (Lady Police) हुज्जत घातली. दुचाकीवरील व्यक्ती विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण (Wakad Crime) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली.

राजु प्रकाश भाटी (वय-25 रा. फ्लॅट नं. 7, उषा मनोहर सोसायटी, औंधगांव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी वाहतूक विभागातील (Sangvi Traffic Police Station) महिला पोलीस नाईक रोहीणी किरण सुर्यवंशी Rohini Suryavanshi (वय-34) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 29) रहाटणी येथील जमतानी ट्रेडर्स समोर सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सांगवी वाहतूक विभागात कार्यरत असून
गुरुवारी रहाटणी येथे कर्तव्य बजावत होत्या. विनामास्क वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करत
असताना आरोपी राजू त्याच्या मोपेड दुचाकीवरुन (एमएच 12 एलएन 7245) आला. त्यावेळी त्याने
मास्क घातला नसल्याने फिर्यादी यांनी त्याला थांबवले. तसेच विनामास्कची पावती करण्यास
सांगितले. याचा राग आरोपीला आला. त्याने फिर्यादी महिला पोलिसाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर. माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात, असे बोलून त्यांच्यासोबत हुज्जत घातली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मणेर करीत आहेत.

हे देखील वाचा

Mumbai Crime | बर्थडे पार्टीसाठी बोलावलं अन् दिलं गुंगीचं औषध, मुंबईमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर ‘रेप’

Corona Vaccination | कोरोनाची दुसरी लाट गर्भवती महिलांसाठी होती भयानक, आवश्यक लस टोचून घ्या – ICMR स्टडी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Wakad Crime | ‘Do what you want, 50 policemen come to me every day, lady policemen give FIR

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update