Waqf Board Land Scam Case | वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक; प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचपूर (chinchpur ashti taluka) येथील जमीन घोटाळ्यात (Waqf Board Land Scam Case) बडतर्फ करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला (Upper Collector N.R. Shelke) अटक (Arrest) करण्यात आली आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch of Beed Police) पथकाने एन. आर शेळकेला औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील जमीन घोटाळ्यात (Waqf Board Land Scam Case) सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एन. आर. शेळकेला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

 

वक्फ बोर्डाची जमीन (Waqf Board Land Scam Case) मदतमाश जाहीर करुन, भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलीस ठाण्यात (Ashti police station) दाखल आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला आहे. शेळके (N.R. Shelke) याच्यावर सेवेत असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फ जमीनीच्या घोटाळ्यातील अनेक आदेश शेळकेच्या सहीने असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

बीड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी (beed district supply officer) असताना शेळकेला (N.R. Shelke) लाच (Bribe) घेताना अटक करण्यात आली होती.
त्यात त्याला बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान, जमीन घोटाळ्यातील बीड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून
या कारवाईने महसूल विभागात (revenue department) प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपी समोर आले आहे. आणखी एक उपजिल्हाधिकारी देखील पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपींची अटक होत नसल्याची तक्रार आमदार बाळासाहेब आजबे (MLA Balasaheb Ajbe)
यांनी पोलीस महासंचालक (DGP) यांच्याकडे केली होती. त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली.
आणि अखेर एन.आर. शेळकेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर (Waqf Board Land Scam Case) प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Waqf Board Land Scam Case | dismissed Upper Collector n r shelke arrested for looting Waqf Board land; Huge excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baby Born Without Face | आश्चर्यकारक ! चेहर्‍याशिवाय झाला मुलीचा जन्म, डॉक्टर म्हणाले – ‘जगणार नाही आणि मग झाला ‘हा’ चमत्कार’

Dr Abdul Qadeer Khan Died | पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादिर खान यांचे कोरोनाने निधन

Navratri Parv | नवरात्रीत जर चुकून सुटला उपवास तर घाबरू नका, ‘या’ उपायांनी कायम राहील मातेची कृपा; जाणून घ्या