‘फ्लू’ आणि ‘कोरोना’ सोबत मिळून शरीराला पोहचवताहेत जास्त नुकसान, मृत्यूचा धोका वाढतो, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये कोरोनाचे दुष्परिणाम आणखी भयानक होऊ शकतात. त्याचे मुख्य कारण हे आहे की नोव्हेंबर मध्ये उत्तर गोलार्धामध्ये फ्लूची सुरुवात होते. भारत उत्तर गोलार्धातच आहे. अशा मध्ये फ्लू आणि कोरोना यांची टक्कर झाली तर एखाद्या विस्फोटापेक्षा कमी नसेल. नोव्हेंबरमध्ये फैलावलेला फ्लू फेब्रुवारीपर्यंत उत्तर गोलार्धामध्ये कायम असतो. चीन आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये आतापर्यंत अशी काही प्रकरणे समोर आली आहेत, त्याच्यामध्ये रुग्ण एकाच वेळी कोरोना वायरस आणि फ्लूमुळे होणाऱ्या विकाराचे बळी झाले आहेत. ज्या डॉक्टरांनी अशा प्रकरणांवर इलाज केला आहे त्यांचे असे म्हणणे आहे की कोरोना आणि फ्लू व्हायरस मध्ये समानता आहे. दोन्ही विषाणू शरीराला सारख्याच पद्धतीने प्रभावित करतात. रोग्याला श्वासा संबंधी समस्या आणि रक्त व प्राणवायू पातळीमध्ये कमतरता या समस्या उद्भवू शकतात. विविध देशांमध्ये या प्रकारच्या समस्या समोर येणे सुरू झाले आहे. सामान्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये अधिक लोक फ्लूची शिकार होतात.

स्टॅनफोर्ड हेल्थकेअर संसर्ग विशेषज्ञ डीन विन्सलॉ

यांच्या मते एक व्हायरस, विषाणू शरीरामधील असताना छोट्या जागेत दुसरा व्हायरस सुद्धा कोशिकांमध्ये प्रवेश करू शकतो. हा काळ कमी असतो. रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमजोर झालेली असते त्यामुळे दुसरा विषाणू सहजपणे त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीवर दोन्ही विषाणूंनी एकाचवेळी हल्ला केला असेल तर तो मरण्याची शक्यता एखाद्या सामान्य करोना रुग्णांपेक्षा दुप्पट होते. या पद्धतीच्या रुग्णांचा उपचार अतिदक्षता विभाग म्हणजे आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरच शक्य होऊ शकेल.

चीनमध्ये या रुग्णांचे सर्वेक्षण केले गेले. त्यांच्यामध्ये अशाच प्रकारची काही लक्षणे आढळली. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दुहेरी संसर्ग इन्फेक्शन एखाद्या जिवघेण्या धोक्यापेक्षा कमी नाही. ज्येष्ठांची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमजोर असते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. फुप्फुसाचे आजार, कॅन्सर, स्थूलपणा आदी आजारांनी जे लोक पीडित आहेत त्यांच्यासाठी संसर्गापासून वाचणे थोडे अवघड आहे. या घातक इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी लक्षणे दिसताच कोरोना आणि फ्लूया दोन्ही आजारांची वेगवेगळी तपासणी करणे आपल्याला आवश्यक आहे. कारण दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास एकसारखी आहेत. साधारण लक्ष ठेवून दोन्हींमध्ये फरक करणे शक्य नाही. त्यामुळे चांगला पर्याय हाच आहे की वेळ मिळताच दोन्ही रोगांची स्वतंत्रपणे तपासणी करावी. अन्यथा त्याच्याशी लढणे सोपे नाही. कोरोना प्रमाणेच फ्लू सुद्धा एक विषाणू आहे, जो कोणाच्याही संपर्कामध्ये येण्यामुळे किंवा थंड वातावरणामुळे होतो. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन केले पाहिजे. मास्क शिवाय बाहेर कोणीही पडू नये. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रोज दहा ते पंधरा मिनिटे उन्हात बसणे आणि थोड्याशा थंडीपासून सुद्धा बचाव आवश्यक आहे.