राज्यात सत्तास्थापनेबाबत ‘राष्ट्रवादी’च्या नेत्याचं मोठं विधान, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले बहुमत पाहता भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, मतदानात मोठ्या प्रमाणात जागा मिळवत राष्ट्रवादी पक्ष विरोधीपक्ष नेतेपद गाजवणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भात मोठं विधान केलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याच म्हंटल आहे. ‘मी सांगू इच्छितो, कि आम्ही सक्षम विरोधीपक्ष नेतेपद भूषविणार आहोत. सत्ता स्थापन करण्याबाबत आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे महायुतीला आमच्या शुभेच्छा आहेत.’ असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेच्या निकालांनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप- सेना महायुतीला यश प्राप्त झाले असले तरी मागील वेळी पेक्षा यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या जागांत घट झाली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने चांगल्या जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीपक्ष नेतेपद भूषविणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Visit : policenama.com