सरकार 5 वर्ष चालेल, ते मजबूर नव्हे तर मजबुत असेल : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांच्या समर्थनामुळे बनलेले सरकार 5 वर्ष चालेल. ते मजबूर नव्हे तर मजबुत असेल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी चार वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन , हर्षवर्धन पाटील , चंद्रकांत पाटील , विनोद तावडे उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या समर्थनाच्या जोरावर राज्याला मजबूत सरकार देणार, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला –
राज्यातल्या सत्ताकारणाला आज पहाटे लागलेल्या नाट्यमय वळणानंतर शिवसेनेवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की , ’24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे निकाल लागले. महायुतीला जनादेश दिला होता. परंतु , या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. अडीच वर्षांचे पहिल्या दिवसापासून सुरु केले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. पण, त्यांना भाजपला भेटायला वेळ नव्हता. शेवटी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, सावरकरांना भारतरत्न देण्याची भूमिका सोडली, तसेच त्यांनी शिव नाव सोडले. सर्वांत जास्त जागा मिळाल्याने आम्हीच सरकार स्थापन करावे, असे सगळ्यांचे मत होते.’

Visit : Policenama.com