OTT वर सुरूच राहणार एंटरटेनमेंटचा प्रवास ! येताहेत ‘या’ 5 वेब सीरिज, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प असलं तरी ऑनलाईन स्ट्रीमिंग फ्लॅटफॉर्म्सवर मात्र मनोरंजनाचा प्रवास सुरूच आहे. इतकंच नाही येणाऱ्या दिवसातही हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. अशात येणाऱ्या 5 प्रोजेक्ट्सबद्दल जाणून घेऊयात.

1) रक्तांचल- ही सीरिज एमएक्स प्लेअरवर रिलीज होणार आहे. रक्तांचलमध्ये तुम्हाला 80 च्या दशकातील दोन बाहुबलींमध्ये झालेली वर्चस्वाची लढाई पहायला मिळणार आहे. ही सीरिज आज (गुरुवार दि 28 मे 2020) स्ट्रीम करण्यात आली आहे.

2) काली सीजन- पहिल्या सीजनच्या यशानंतर आता झी 5 वरील दुसरा सीजन रिलीजसाठी तयार आहे. पाताल लोकमधील हतोडा त्यागी म्हणजेच अभिषेक बॅनर्जी तुम्हाला या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 29 मे रोजी रिलीज होणार आहे.

3) चोक्ड- अनुराग कश्यप पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर वापसी करणार आहे. घोस्ट स्टोरीजनंतर आता चोक्ड घेऊन येत आहेत. नोटबंदीनंतर एका महिलेची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. सैयामी खेड लिड रोलमध्ये आहे. 5 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

4) कहने को हमसफर है- रॉनित रॉय आणि मोना सिंह यांची वेब सीरिज कहने को हमसफर है पुन्हा वापसीसाठी तयार आहे. याचा तिसरा सीजन येत आहे ज्यात फॅमिली ड्रामा पहायला मिळणार आहे. 6 जून रोजी ही सीरिज झी 5 वर रिलीज होणार आहे.

5) द कॅसीनो- करणवीर बोहरा देखील त्याच्या डिजिटल डेब्यासाठी तयार आहे. ही सीरिज झी 5 वर रिलीज होणार आहे. यात नेपाळमधील कॅसीनोमध्ये सुरू असणारं कौटुंबिक भांडण यात दाखवण्यात आलं आहे. 12 जून रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like