Vidya Balan ची ‘शकुंतला देवी’ सर्वाधिक पाहिला जात असलेला ‘दूसरा’ सिनेमा, पहिला तर तुम्हाला माहितच असेल !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेला विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दुसर्‍या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. ओमेक्स मीडियाच्या अहवालात हे उघड झाले आहे. पहिल्यांदा सुशांत सिंग राजपूतचा दिल बेचरा आहे, जो 24 जुलैला डिस्नी प्ले हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. ओमेक्स मीडियाने टॉप 10 डायरेक्ट टू ओटीटी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीच्या आधारे ही यादी तयार केली गेली आहे. या यादीमध्ये 81 रेटिंगसह दिल बेचरा प्रथम तर 71 रेटिंगसह शकुंतला देवी दुसर्‍या स्थानावर आहेत. शकुंतला देवी 31 जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटात विद्या बालन ही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले.

त्यांनतर नेटफ्लिक्सचा अ‍ॅथॉलॉजी फ़िल्म लस्ट स्टोरीज 66 रेटिंगसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. विकी कौशलच्या लव पर स्क्वेअर फुट 62 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, डिस्नि प्लस हॉटस्टारवरील लूटकेस 60 च्या रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. नुकत्याच नेटफ्लिक्सवर दिसणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांचा ‘रात अकेली है’ हा चित्रपट 58 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कियारा अडवाणीचा गिल्टी (58), इमरान हाश्मीचा टायगर्स 58), अमिताभ बच्चन-आयुष्मान खुरानाचा गुलाबो सीताबो (57) आणि विनय पाठक यांचा चिंटू का बर्थडे ( 57) हे सर्वकालिक चित्रपटांच्या यादीत अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या दहाव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमधील थिएटर बंद केल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली आहे. ओटीटीच्या व्यासपीठावर बरेच मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गुंजन सक्सेना नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. आगामी काळात अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, अजय देवगणचा भुज – द प्राइड ऑफ इंडिया आणि अभिषेक बच्चनचा द बिग बुल हादेखील ओटीटीवर रिलीज होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like