Wedding Anniversary : मोनालिसाच्या ‘या’ गोष्टीवर फिदा होता पती विक्रांत सिंग ! ‘अशी’ आहे ‘Love Story’

पोलिसनामा ऑनलाइन –भोजपुरी स्टार आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. नुकताच मोनालिसानं पती विक्रांत सिंग याच्यासोबत एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो. आज 12 वर्षे झाली. खरं तर या हॉट कपलची आज(दि 24 एप्रिल) वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. आज आपण त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत.

बंगाली हिंदू कुटुंबात जन्मलेल्या मोनालिसाला फिश राईस खूप आवडतं. तिला क्रिकेट पाहायला अजिबात आवडत नाही. विक्रांत मात्र किक्रेट प्रेमी आहे. 2008 साली आलेला भोजपुरी सिनेमा दुल्हा अलबेला या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. मोनालिसाला कुठे माहित होतं की, तिला खरंच हा दुल्हा भेटणार आहे.

मोनालिसानं सांगितलं की, “मला तर वाटत होतं की, ही शुटींग संपूच नये. मला आणखी एका सिनेमासाठी आउट ऑफ टाऊन जावं लागलं. तिथे गेल्यानंतर मला जाणीव झाली की, काहीतरी आहे जे मी मिस करत आहे. मी शुटींगनंतर जास्त करून विक्रांतसोबत बोलताना दिसत होते.”

विक्रांतलाही वाटलं की, मोनालिसा त्याच्यासाठी परफेक्ट आहे. सेटवर सर्वांना समान वागणूक देणं हे विक्रांतला खूप आवडलं होतं. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. सध्या दोघंही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.