प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही ? जाणून घ्या जास्त कॅलरीज बर्न करण्याची शरीराची योग्य वेळ !

पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध पर्याय करत असतात. अनेकदा एक्सरसाईज आणि डाएट करूनही म्हणावा तसा फरक दिसत नाही. कारण बरेचजण एका महत्त्वाच्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात ती म्हणजे वजन कमी करण्याची वेळ.

वजन कमी करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्या वेळी काय खाता, एक्सरसाईज कधी करता आणि शरीरासाठी कॅलरीज बर्न करण्याची योग्य वेळ अशा या तीन गोष्टी आहेत. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.

आपलं शरीर आपल्या टायमिंग नुसार कॅलरीज बर्न करत नसतं. तर कॅलरीज बर्न करण्याचा त्याचा स्वत:चा एक टायमिंग असतो. याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत की, शरीर नेमकं कधी जास्त कॅलरीज बर्न करतं आणि कधी कमी कॅलरीज बर्न करतं.

काय सांगतात तज्ज्ञ ?
तज्ज्ञांच्या मते आपलं शरीर दुपारी आणि सायंकाळी सर्वात जास्त कॅलरीज बर्न करतं. तर सकाळी शरीर कमी कॅलरीज बर्न करतं.

एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, जास्तीत जास्त लोक सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत जवळपास 10 टक्के अधिक कॅलरीज बर्न करतात. आपलं शरीर यावेळेत प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करतं. मग आपण काहीही करत असो. यानं काहीही फरक पडत नाही. कामानंतर तुम्ही घरी परत जात असाल किंवा कुठलं दुसरं काम करत असाल तर यावेळी शरीर एका खास प्रमाणात कॅलरीज बर्न करतं.

आपलं शरीर सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत सर्वात कमी कॅलरीज बर्न करतं. याचं कारण म्हणजे आपल्या शरीराच्या कार्डिनल घडाळ्यानुसार ही वेळ आरामाची असते. यावेळी शरीर आराम करण्याच्या मोडवर असतं. म्हणून शरीर जेव्हा आराम करत असतं तेव्हा कमीत कमी कॅलरीज बर्न करत असतं. म्हणूनच जे लोक सकाळी 4 ते 6 या वेळेत घाम गाळतात त्यांना म्हणावा तेवढा फायदा मिळत नाही.

याशिवाय अनियमित शेड्युलमध्ये जर तुम्ही काही खात असाल तर तुमच्या शरीरातील जास्त कॅलरीज बर्न होणार नाही. यावेळी शरीर साठवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.

कॅलरी बर्न करण्यात शरीराच्या अंतर्गत घडाळ्याचा मोठा रोल असतो. हेच कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त मदत करतं. म्हणून वजन कमी करायचं असेल तर बाहेरील जगाच्या घड्याळासोबतच शरीराच्या अंतर्गत घडाळ्यासोबत जुळवून घेणंही महत्त्वाचं असतं. हे दिवसा योग्य वेळी उन्हाच्या संपर्कात येण्यानं आणि योग्य वेळी आहार घेऊन तसंच रात्री कमी खाऊन किंवा उपवास करून होत असतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.