कपिल देव यांचा ‘लूक’ पाहुन अनुपम खेर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात व्हायरसमुळे देशात लॉकडाउन असल्याने सर्वकाही आस्थापना बंद आहेत. दाढी-केस कटिंगची दुकानेही बंद असल्याचा फटका सामान्यांसह दिग्गजांनाही बसला आहे. परिणामी भारताचा माजी क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर, सध्याचा कर्णधार विराट कोहली यांनी घरीच केस कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी कपिल देव यांनी टक्कल केलेला आणि फ्रेंच कट दाढी असलेला नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून त्यांचा मेकओव्हर केलेला हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया दिली असून काहींनी त्यांच्या या लूकची तूलना वेस्ट इंजिडचे माजी महान खेळाडू विवियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. तर काहींनी त्यांची कटप्पा, रजनीकांत, थानोस, यांच्याशी तुलना केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनीही कपिल देव यांच्या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. माझे मित्र कपिल देव यांनीही केलेला टक्कल फॅशन म्हणून याला ‘शेव्हड’ म्हणतात. जगात केवळ टकले आणि भविष्यातील टकले अशा दोन प्रकारचेच पुरुष असल्याचे मी नेहमी म्हणत आलोय..गंजों की महफिल में आपका ‘बालों रहित’ स्वागत है, अशा आशयाचे ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. ट्विटमध्ये अनुपम खेर यांनी कपिल देव यानाही टॅग केले आहे.