‘क्राईम पेट्रोल’ फेम प्रेक्षा मेहताच्या आत्महत्येपुर्वीच्या रात्री नेमकं काय घडलं होतं ? अभिनेत्रीच्या ‘कजन’चा मोठा ‘खुलासा’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं इंदोरमधील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच(सोमवार दि 25 मे 2020) समोर आली आहे. या घटनेनं प्रेक्षाच्या कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. अद्याप तिच्या आत्महत्येमागचे कारणही समजू शकलेलं नव्हतं. प्रेक्षाच्या शेवटच्या व्हॉट्स अ‍ॅप स्टेसस आणि सोशल मीडियावर एक निराशाजनक पोस्ट केली होती. यानंतर आता तिची सुसाईड नोट समोर आली आहे. प्रेक्षानं हे पाऊल का उचललं याचा उलगडा आता झाला आहे. पोलिसांनी तिच्या सुसाईड नोटची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर आत्महत्येच्या आदल्या रात्री काय घडलं होतं याबद्दल तिच्या कजननं खुलासाही केला आहे.

घरातले खेळत होते पत्ते, पायऱ्यांवर एकटीच बसली होती प्रेक्षा
प्रेक्षाबद्दल माहिती देताना तिच्या घराजवळच राहणाऱ्या तिच्या कजननं सांगितलं आहे की, “प्रेक्षा लहानपणाासून खूप उत्साही आणि जोशीली मुलगी होती. पंरतु काही दिवसांपासून ती एकदम शांत झाली होती. गेल्या रात्री (आत्महत्येच्या आदल्या दिवशी) पूर्ण कुटुंब पत्ते खेळत होतं. परंतु प्रेक्षा मात्र पायऱ्यांवर बसली होती.”

https://twitter.com/30Kumaar/status/1265286273289379840?s=20

प्रेक्षाचा कजन पुढे म्हणाला, “माझी काकू म्हणजेच प्रेक्षाची आई तिच्याजवळ गेली आणि तिनं प्रेक्षाला विचारलं की, तू ठिक तर आहेस ना. तेव्हा प्रेक्षानं असंही सांगितलं की, ती एकदम ठिक आहे. यानंतर रात्री 10 वाजता प्रेक्षा वर असणाऱ्या तिच्या रूममध्ये निघून गेली. तिनं इंस्टाग्रामवर निराशाजन पोस्टही टाकली होती. यानंतर सकाळी प्रेक्षाची आई जेव्हा तिला योगासाठी उठवायला गेली तेव्हा तिची रूम आतून लॉक होती. काकूंनी इतर लोकांच्या मदतीनं दरवाजा उघडला तेव्हा प्रेक्षा पंख्याला लटकलेल्या अवस्थे दिसली.”

प्रेक्षाच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय ?
नगर पोलीस ठाण्याचे इंस्पेक्टर राजीव भदौरिया यांनी एका प्रेक्षाच्या सुसाईड नोटविषयी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, “माझ्या तुटलेल्या स्वप्नांनी माझा विश्वास संपला आहे. मी माझ्या मेलेल्या स्वप्नांना घेऊन नाही जगू शकत. या निगेटीव्हिटीसोबत राहणं खूप अवघड आहे. गेल्या वर्षभरापासून मी खूप प्रयत्न केला. आता मी थकले आहे.”

पोलिसांनी अशी माहिती दिली की, काम न मिळाल्यानं प्रेक्षा डिप्रेशनमध्ये होती. तिच्या नोटवरूनच लक्षात येत आहे की, ती किती त्रासात होती. तिनं तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलेलं नाही.

प्रेक्षा इंदोरमधील बजरंग नगरमधील तिच्या घरात रहात होती. सोमवारी(दि 25 मे 2020) रात्री तिनं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती असं तिच्या घरचे सांगतात.