‘गाऊट’ म्हणजे नक्की काय ? ‘ही’ त्याची लक्षणं, कारणं अन् उपाय !

गाऊट म्हणजे काय ?
रक्तात युरीक अॅसिडचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं वेदनाकारक संधीवात होतो. यालाच गाऊट म्हणतात. हाडांच्या सांध्यात युरीक अॅसिड जमा झाल्यानं सई सारखे खडे बनतात यामुळं अचानक वेदना होतात.
काय आहेत याची लक्षणं ?
– साधारण याचा परिणाम पायाच्या अंगठ्याच्या सांध्यावर होतो.
– सांध्याला (विशेषत: गुडघा, पायाची बोटं, हाताचं ढोपर आणि बोटं) यात तीव्र आणि अचानक वेदना)
– प्रभावित जागेची त्वचा लाल गरम होऊन सूजते.
– ताप आणि थंडी
काय आहेत याची कारणं ?
– रक्तात युरीक अॅसिड जमा झाल्यानं सांध्यात युरेटचे खडे बनतात.
– अनुवांशिक आणि पर्यावरणाचा घटक यांच्या एकत्रीकरणानं
– जेवणात प्युरीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यानं
– लठ्ठपणा
– अति मद्यपान
– स्युडोगाऊट
काय आहेत यावरील उपचार ?
1) वेदनेमुळं होणाऱ्या दुखण्याचं व्यवस्थापन करणं
– स्टिरॉईड्स नसलेली अँटी इंफ्लामेटरी औषधं (एनएसएआयडीएस) जशी आयब्रुफेन, स्टिरॉईड्स अँटी इंफ्लामेटरी औषध कॉलचीसीन वेदनेवर उपचारासाठी वापरले जातात.
2) भविष्यात फ्लेअर्स होऊ नये म्हणून
– आहार व जीवनशैली बदलणं
– अतिरीक्त वजन कमी करणं
– मद्याचा वापर टाळावा.
– प्युरीनयुक्त आहार टाळावा (रेड मीट किंवा ऑर्गन मीट)
– हायपरयुरिसेमिया संबंधित औषध बदलणं किंवा बंद करणं (उदा ड्यरेटीक्स)
3) युरीक अॅसिड कमी करणाऱ्या गोष्टींचा वापर करा.
– ऑलोपुरिनोल
– फेबुओस्टेट
– पेग्लोटेस
4) स्व व्यवस्थापन धोरणं
– निरोगी आहार घ्या
– नियमित आणि पुरेसा शारीरिक व्यायाम