PM मोदींचा फोन आला तर… प्रश्नाला संजय राऊतांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसून हा तिढा कसा सोडवता येईल यासाठी राज्यातील नेते दिल्लीतील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. निकालानंतर 12 दिवसानंतरही राज्यात सत्ता येणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी राऊत यांना मोदींच्या फोनबद्दल प्रश्न विचारला.

एका पत्रकाराने ‘राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दिल्लीतून फोन आलाच तर…’ असा प्रश्न विचारत असताना राऊतांनी पत्रकाराला थांबवत ‘कुणाचा फोन?’ असा सवाल केला. त्यावर ‘मोदींचा फोन आला तर..’ असे पत्रकाराने विचारले असता त्यांनी पत्रकाराला पुन्हा थांबवत ‘नाही नाही मला काही माहिती नाही’ असं सांगत प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. म्हणजेच मोदींच्या फोनबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सोमवारी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. त्यांना राज्यातील परिस्थितीबद्दल सांगितले. सध्या राज्यात पडद्यामागे आणि पुढे काय घडतय हे त्यांना सांगितले. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्राचा निर्णय आता महाराष्ट्रच घेईल असेही राऊत यांनी यावेळी म्हटले. दिल्लीतील घडामोडीबद्दल विचारले असता, इतर पक्षांमध्ये दिल्लीत काय घडलं हे आपल्याला ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर पक्षांमध्ये काय सुरु आहे. त्यांनी बैठकीमध्ये काय निर्णय घेतले आहेत याबद्दल देखील आम्हाला काहीच ठाऊक नसल्याचे राऊत यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास