पुरुषांमध्ये देखील 5 वर्षे उशीरा येते ‘मोनोपॉज’ची स्थिती ! जाणून घ्या कोणते बदल होतात अन् काय काळजी घ्यावी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  स्रीमध्ये मोनोपॉजची स्थिती येत असते हे तर साऱ्यांनाच माहित आहे. परंतु पुरषांमध्येही मोनोनपॉजची प्रक्रिया होते हे खूप कमी लोकाना माहित आहे. ही फक्त स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भातील प्रक्रिया नाही तर पुरुषांच्या शरीरातही अनेक हार्मोनल बदल होत असतात. शिवाय वयाच्या एका टप्प्यात त्यांनाही आधाराची गरज असते. पुरुषांमध्ये ही प्रक्रिया कशी होते, याचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊयात.

वयाचं अंतर – महिलांमध्ये मोनोपॉजची स्थिती वयाच्या 45 नतंर येते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 वर्षे लागतात. काही महिलांना 10 वर्षेही लागू शकतात. शारीरिक स्थितीवर याची स्थिती अवलंबून असते.

पुरुषांमध्ये वयाच्या 50 ते 60 वर्षांनंतर ही स्थिती येते. शरीरात इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यानं असा मोनोपॉज येतो. पुरुषांमध्येही हार्मोनल चेंजेस होतात. कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि पोषक आहारात कमतरता जाणवू लागते.

या स्थिती पुरुषांनाही आधाराची गरज असते. चिडचिड होणं, एकटेपणा, उदस वाटणं अशी स्थिती होते. या काळात पुरुषांना कार्डियोवॅस्कुलर डिसीज, पचनशक्ती मंदावणं, मूड स्विंग्स होणं, हाडं कमकुवत होणं अशा समस्या जाणवतात. झोप न येणं. डिप्रेशन, मेमरी लॉस अशा समस्याही जाणवतात.

‘अशी’ घ्या काळजी

–  वयाच्या पन्नाशी नंतर आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमियुक्त पदार्थ असावेत.

–  व्यायाम करावा.

–  तणावमुक्त राहण्यासाठी मेडिटेशन करावं.

–  हाडं मजबूत होतील असे पदार्थ खावेत.

–  चांगली झोप घ्यावी.