31 डिसेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp, यादीमध्ये पहा तुमचा तर ‘हॅन्डसेट’ नाही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वॉट्सअ‍ॅप ने आपल्या ब्लॉग पोस्ट द्वारे काही महत्वाची माहिती दिली आहे. यानुसार काही ग्राहकांना आता आपल्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीममुळे वॉट्सअ‍ॅपचा वापर करता येणार नाही.

वॉट्सअ‍ॅपने ब्लॉगमध्ये म्हंटले आहे की, जर तुम्ही विंडोज फोन वापरात असाल आणि तुम्हाला वॉट्सअ‍ॅप वापरायचे असेल तर नवीन वर्ष सुरु होण्याआधी तुम्हाला नवीन फोन घ्यावा लागेल. कारण 31 डिसेंबर पासून वॉट्सअ‍ॅप विंडोजफोनमध्ये चालणार नाही. याआधी देखील वॉट्सअ‍ॅपने हे स्पष्ट केले आहे की जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या फोनकडेच वॉट्सअ‍ॅपचे मोठ्या प्रमाणावर लक्ष आहे.

या फोनमध्ये नवीन वर्षपासून चालणार नाही वॉट्सअ‍ॅप
तसेच वॉट्सअ‍ॅपने हे देखील सांगितले आहे की पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिण्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून ios 8 साठी वॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद केला जाणार आहे. ios 8 किंवा त्यापेक्षा जुन्या असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. तसेच अँड्रॉइड युजर्स साठी 2.3.7 (Gingerbread) किंवा त्यापेक्षा जुन्या os वर वॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

वॉट्सअ‍ॅपने आधी देखील दिली होती याबाबत माहिती
या आधी जून महिन्यात वॉट्सअ‍ॅपने आपल्या ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये माहिती देण्यात आली होती की एंड्रॉयड वर्जन 2.3.7 आणि त्या आधीच्या ऑपरेटिंग सिस्टम, तसेच iOS 7 आणि त्या आधीच्या ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्या आयफोनमध्ये 1 फेब्रुवारी 2020 नंतर वॉट्सअ‍ॅप चालणार नाही. 31 डिसेंबर 2017 नंतर ब्लॅकबेरी OS, ब्लॅकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि जुन्या मोबाईलमध्ये वॉट्सअ‍ॅप बंद करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/