‘WhatsApp’ चं ‘हे’ नवीन फिचर क्षणात ‘गायब’ करेल तुम्ही पाठवलेले मेसेज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईटसपैकी लोकप्रिय असणारे व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. अधिक युजर फ्रेंडली बनण्यासाठी इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप (instant messaging app) व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर लाँच केले आहे. हे फीचर Android बीटा 2.19.275 मध्ये उपलब्ध आहे. हे सेल्फ डिस्ट्रक्ट मेसेज फीचर आहे ज्या अंतर्गत मेसेज स्वतःहून डिलीट होतील. येथे आपण टायमरही सेट करू शकाल.

व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅक करणार्‍या वेबसाईट WAbetainfo ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सअ‍ॅपने या सेल्फ-डिस्ट्रक्ट चॅट मोडच्या फीचरची चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. हे फीचर फेसबुक मेसेंजरमध्येही उपलब्ध आहे. परंतु ते वापरण्यासाठी तुम्हाला फेसबुक मेसेंजरमध्ये देण्यात आलेला सिक्रेट चॅट पर्याय वापरावा लागेल. सिक्रेट चॅट अंतर्गत आपण टाइमर सेट करू शकता आणि या दरम्यान आपले चॅटींग आपोआप डिलिट होईल.

मेसेंजर व्यतिरिक्त टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या सुरक्षित मेसेजिंग अ‍ॅप्समध्येही हे फीचर देण्यात आले आहे, व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर सध्या ग्रुपसाठी असेल. यासाठी, ग्रुप इन्फॉरमेशनवर जाऊन Disappearing Messages अनेबल करावे लागेल.

WABetainfo च्या अहवालानुसार हे फीचर सध्या अल्फा स्टेजमध्ये आहे, म्हणजेच कंपनीने त्यावर आधीच काम सुरू केले आहे. कंपनी हे फीचर सर्वसामान्यांसाठी केव्हा जाहीर करेल हे सध्या निश्चित झाले नाही.

Visit : Policenama.com