खुपचं कामाचं आहे ‘गूगल’शी जोडलेलं WhatsApp चं ‘हे’ नवीन गरजेचं फीचर, जाणून घ्या ‘कसं’ काम करणार

पोलीसनामा ऑनलाईन –   व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लाँच केले आहे. हे नवीन फिचर म्हणजे ‘सर्च’ जे खास वेब / डेस्कटॉपसाठी आहे. WABetaInfo हे नवीन फिचर देताना सांगितले कि, हे नवीन फिचर ‘सर्च’ केवळ वेब / डेस्कटॉपच्या लेटेस्ट व्हर्जनवर काम करेल. जे विशेषत: बनावट बातम्यांना प्रतिबंधित करण्यासाठी आहे.

काय आहे नवीन ‘सर्च’ फिचर ?

यात ‘ Search Messages on the Web ‘ नावाचे फिचर असेल. वेबवरील संदेशासमोर एक सर्च बटण तयार केले जाईल. याअंतर्गत, वापरकर्ते थेट व्हॉट्सअॅपवरून Google वर पाठविलेले संदेश शोधू शकतील आणि पाठविलेला संदेश बनावट आहे की नाही ते तपासू शकतील. दरम्यान, हे शोध बटण केवळ Frequently Forwaded Message च्या समोर दिसेल. हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल याबद्दल WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

फॉरवर्ड केलेल्या संदेशासमोर एक सर्च चिन्ह दिसेल. या चिन्हावर टॅप करताच, एक संदेश पॉप अप होईल, ज्यावर लिहिले जाईल, ‘तुम्हाला हा वेब शोधायचा आहे का? हे आपला संदेश गुगलवर अपलोड करेल. ‘ WABetaInfo सांगितले की, हे नवीन फीचर ‘ frequently forwaded messages ‘ फिचर लक्षात घेऊन तयार केले जात आहे. त्याअंतर्गत फॉरवर्ड केलेला मेसेज हा बनावट मेसेज आहे की नाही याची तपासणी करता येईल.