जर तुमच्या WhatsApp वर ‘हा’ मेसेज आलाय तर व्हा सावध, अन्यथा तुमच्या बँक अकाऊंट…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. अलिकडच्या काळात त्याच्या वापरामध्ये 40% ने वाढ झाली आहे. कोविड-19 साथीच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप हे एकमेव असे अ‍ॅप आहे ज्याच्या लोकप्रियतेत इतकी मोठी वाढ पाहण्यात आली आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणूकीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या टेक्निकल टीमचे सदस्य म्हणून आपली ओळख सांगत वापरकर्त्यांना त्यांचा पडताळणी कोड विचारत आहेत.

व्हेरिफिकेशन कोड सामायिक करू नका
व्हॉट्सअ‍ॅपचे फीचर्स ट्रॅक करणार्‍या ब्लॉग WABetaInfo ने हा घोटाळा उघड केला आहे. WABetaInfo ने ट्विट करत सांगितले की डॅरिओ नवारो या वापरकर्त्याने त्याला पाठविण्यात आलेल्या एका संशयास्पद संदेशाबद्दल विचारले. त्याने एक स्क्रीनशॉट सामायिक केला ज्यामध्ये स्पॅनिश भाषेत एक संदेश लिहिलेला होता. यामध्ये वापरकर्त्यास आपल्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी सहा क्रमांकाचा व्हेरिफिकेशन कोड पाठविण्यास सांगण्यात आले जो एका एसएमएसद्वारे पाठवण्यात आला होता.

फोनवर येतो हा मॅसेज
WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत खात्यासारखे दिसणार्‍या एका खात्यातून संदेश येतो. ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचा व्हेरिफिकेशन कोड सामायिक करण्यास सांगितले जाते. या खात्यावर व्हॉट्सअ‍ॅप लोगो प्रोफाइल पिक्चर म्हणून लावण्यात आला आहे. व्हेरिफिकेशन कोड नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप खाते सक्रिय करण्यासाठी वापरला जातो, जो वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर एसएमएसद्वारे मिळतो. या सुरक्षा कोडचा उद्देश मेसेजिंग अ‍ॅपवर वापरकर्त्यांच्या खात्यांचे रक्षण करणे हा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपवर वापरकर्त्यांशी कधीही संपर्क साधत नाही
उल्लेखनीय म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपवरील वापरकर्त्यांशी कधीही संपर्क साधत नाही. आणि कंपनी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत वापरकर्त्याशी संपर्क साधत असली तरीही, अधिकृत खात्याच्या नावाबरोबरच एक हिरव्या रंगाचे व्हेरीफाईड चिन्ह असते जे सूचित करते की ते अधिकृत खाते आहे. आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांकडे व्हेरिफिकेशन कोडसह त्यांच्या कोणत्याही डेटाशी संबंधित कोणतीही माहिती विचारत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like