WhatsApp मध्ये येत आहेत 2 नवीन ‘फीचर्स’, लॉकडाऊनमध्ये ‘एकदम’ फायदेशीर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम (Zoom) जगभरात लोकप्रिय होत आहे. हे लक्षात घेता अन्य कंपन्या देखील त्यांच्या व्हिडिओ कॉलिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल आणि त्याची व्याप्ती वाढवण्याचे काम करत आहेत. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) देखील ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये अधिक लोकांना जोडण्यावर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या केवळ चार लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉलिंग करू शकतात.

अँड्रॉइडसाठी जाहीर करण्यात आलेले व्हॉट्सअ‍ॅप बीटावरून असा संकेत मिळाला आहे की, ग्रुप व्हिडिओ कॉलची मर्यादा कंपनी वाढवू शकते. झूम आणि गूगल डुओ सारख्या अन्य व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मवर डझनभर लोक एकाच वेळी व्हिडिओ चॅट करू शकतात आणि आता सोशल डिस्टेंसिंगसाठी ही एक आवश्यकता बनली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्सचा ट्रॅक ठेवणारी वेबसाइट WABetainfo च्या अहवालानुसार अँड्रॉइडसाठी जारी करण्यात आलेल्या WhatsApp v2.20.128 बीटा मध्ये एक्स्टेंडेड ग्रुप लिमिट देण्यात आली आहे. तथापि, कंपनीने यास अद्याप लोकांसाठी सक्षम केलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉल्सची मर्यादा वाढवून किती केली जाईल हे सध्या तरी समजलेले नाही. परंतु लवकरच कंपनी ही घोषणा करू शकते, कारण अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप कॉलिंगमध्ये काही बदल केले होते.

विशेष म्हणजे ग्रुप कॉलिंग इंटरफेसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने काही बदल केले आहेत. ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी एक डेडिकेटेड बटण प्रदान केले गेले आहे जेणेकरून आपण गटातील सर्व सदस्यांना कॉल करू शकाल. यासाठी प्रत्येकाने व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करणे गरजेचे आहे. कॉलिंगसंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपच्या दुसर्‍या नव्या फीचरबद्दल बघितले तर, Android v2.20.129 व्हर्जनमध्ये एक नवीन कॉल हेडर आला आहे. वास्तविक, या कॉल हेडरमध्ये हे मेंशन होईल की कॉल end-to-end encryption आहे. end-to-end encryption म्हणजे असे की दोन्ही लोकांमधील संभाषणाचा डेटा व्हॉट्सअ‍ॅप किंवा कोणतीही एजन्सी डीकोड करू शकणार नाही.