अफवांना ‘लगाम’ घालण्यासाठी WhatsApp आणतंय ‘व्हेरिफाय’ फीचर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – यावेळी देश कोरोना व्हायरस महामारीशी लढत असून यादरम्यान सोशल मीडियावरही अनेक अफवा आणि दावे होत आहेत. अफवांना थांबवण्यासाठी WhatsApp ने पुढाकार घेत असे एक फिचर आणत आहे ज्यामुळे सहजपणे अफवांना थांबवले जाऊ शकते. खरतर WhatsApp च्या माध्यमातून अफवा पसरायला वेळ लागत नाही. एका मेसेजला फॉरवर्ड करून चुकीची माहिती लोकांमध्ये पसरते, हे आपण पाहिले आहे.

WhatsApp ने यालाच लक्षात घेऊन एका नवीन फिचरवर काम करत आहे, जे अफवांना थांबवण्यासाठी मदतपूर्ण सिद्ध होईल. हे फिचर तुमच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजला क्रॉस चेक करेल ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल कि ती गोष्ट किती बरोबर आहे आणि किती चुकीची.

WhatsApp’s Beta (व्हॉट्सअ‍ॅप बीटा) Info नुसार WhatsApp’s Beta अपडेट “फ्रीक्वेंटली फॉरवर्ड मेसेज”ला सर्च करण्याचा पर्याय देते. जे व्हाट्सऍप मेसेजचे लेबल दर्शवण्यास मदत करेल, म्हणजेच तुमच्याकडे आलेला मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला गेला आहे, टॉप लिस्टवर मेसेजमध्ये किती सत्य आहे आणि किती अफवा. जर टॉप लिस्टमध्ये शामिल असेल तर त्याला अफवा मानले जाऊ शकते.

WhatsApp चे हे नवीन फिचर एक ‘मॅग्निफाईन्ग ग्लास’ आयकॉनच्या रूपात फॉरवर्ड मेसेजसह येईल. फॉरवर्ड मेसेज आल्यावर जर तुम्ही मॅग्निफाईन्ग ग्लासवर क्लिक केले तर ते गुगल सर्च करून तुम्हाला त्याची माहिती देईल. व्हाट्सऍपने कन्फर्म करत सांगितले की, आत्ता या फीचरची टेस्टिंग चालू आहे. लवकरच या फीचरला अपडेट केले जाईल.

WhatsApp चे प्रवक्ता म्हणाले की, हे फिचर काढण्याचा उद्देश एकच आहे कि चुकीच्या अफवांना पसरण्यापासून रोखने. चुकीच्या अफवांमुळे चालू असलेले वातावरण खराब होण्यास जराही वेळ लागत नाही. याला रोखण्यासाठी या फीचरला अपडेट केले जात आहे.

सीएए-एनआरसी दरम्यान अफवांना नेटवर्किंग साइट जसे WhatsApp, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. त्यानंतर देशभरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. सरकारने अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंटरनेटवर काही दिवसांसाठी बंदी घातली होती.