२३ लाखांच्या ५८८ अलॉय व्हील चोरणारा अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चाकण एमआयडीसी येथील महिंद्रा लॉजिस्टीकच्या गोदामासमोरून कंटेनरमधील २३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताजूद्दीन चौधरी असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कुरुळी येथील महिंद्रा लॉजिस्टीकच्या गोदामाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कंटेनरचा चालक रईस अली याने २३ लाख ३६ हजार रुपयांचे अटोमोटिव्ह अलॉय व्हील चोरून नेले होते. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर याप्रकरणी तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रईस अली याने साथीदार ताजुद्दीन चौधरी याच्याविरोधात चोरी केली आहे. तो कुदळवाडी येथील चौधरी वजनकाट्याजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेले २३ लाख ३६ हजार ९०९ रुपये किंतमीच्या ५८८ अलॉय व्हील जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, सुनील दहिफळे, उपनिरीक्षक विक्रम पासलकर, कर्मचारी शिवेंद्र स्वामी, राजू जाधव, संदिप सोनवणे, संपत मुळे, अमोल बोराटे, प्रदिप राळे, दिपक शिंदे, यांनी केली.

Loading...
You might also like