Video : हॉस्पीटलच्या पायर्‍यावर उपचारासाठी वाट पाहात बसलं जखमी माकड, त्यानंतर कर्मचार्‍यांनी पाहिलं, व्हिडीओ व्हायरल

दांडेली/ कर्नाटक : वृत्तसंस्था – सध्या एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीस तुम्ही पाहू शकता एका रुग्णालयाच्या गेटवर एक माकड बसलेलं आहे आणि तेथून ये-जा करणाऱ्या लोकांना पहात आहे. परंतु थोड्यात वेळाने त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारा कर्मचारी त्याठिकाणी येतो आणि माकाडाच्या शरीराची तपासणी करण्यास सुरुवात करतो. जेणेकरून जर त्याला दुखापत झाली असेल तर तो त्याच्यावर उपचार करू शकेल. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडिओ कर्नाटकमधील दांडेलीच्या पाटील रुग्णालयाचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसतेय की कर्मचारी माकडाची कशा पद्धतीने काळजी घेत आहेत.

हा व्हिडिओ ‘लेट्स गो दांडेली’ने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओत एक वानर रुग्णालयाच्या बाहेर शांतपणे बसलेले आहे आणि इतर लोकांना अतिशय उत्सुकतेने पहात आहे. थोड्यावेळाने या रुग्णालयात काम करणारा कर्मचारी येतो आणि माकड रुग्णालयाच्या हात धुण्याच्या बेसिनवर बसते. रुग्णालयातील कर्मचारी माकडाच्या शरीराची प्रेमाने तपासणी करत असून त्याला कुठे लागलेय का हे पहात आहे. माकडाची वैद्यकीय तपासणी सुरु असताना एक माणूस म्हणत आहे की, तो या रुग्णालयात आपले उपचार करून घेण्यासाठी आला आहे.

हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी संदीप त्रिपाठी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहले आहे की, दांडेली पाटील रुग्णालयात उपचारानंतर जखमी माकड बरे झाले. या रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
भावनिक असलेल्या या व्हिडोला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला. काही तासातच 32 हजार पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच एक हजारापेक्षा जास्त जणांनी यावर कमेंट्स केल्या आहे. एकाने कमेंट करताना लिहले आहे की, या वानराला एवढ्या चांगल्या पद्धतीने वागणूक देणाऱ्या या वैद्यकीय कर्मचाऱ्याचे मनापासून आभार.