इंदापूरातील अवैध व्यवसायाला आळा कधी बसणार.?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर शहर व परिसरातील विविध हाॅटेल,ढाबे, अडचणीची ठिकाणे, शहरातील मध्यवस्तीतील मटन मार्केट, व नगरपरिषदेने भाडेतत्वावर दिलेले काही गाळे अशा ठीकाणी अवैध दारू विक्री, गुटखा विक्री,मुंबई-कल्याण मटका, सोरट,हायवे रोडवरील अवैध प्रवासी वाहतूक यासारखे आनेक अवैध धंदे सध्या इंदापूर भागात राजरोसपणे चालु असुन याकडे संबधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशा अवैध व्यवसायाच्या वाममार्गाला लागुन तरून व युवा पिढी बर्बाद होत चालली आहे.तर आनेक सुशिक्षित बेकार तरूण, युवक हे अवैध धंद्याच्या नादी लागुन व्यसनाधीन बनत चालले असल्याचे सर्वत्र चित्र आहे.अशा अवैध धंद्यावर पोलीसांकडून तात्पुरती कारवाई केली जाते व कागदोपत्री गुन्हे दाखल करण्यात येतात. परंतु पुन्हा असे धंदे चालुच असतात.आतापर्यंत पोलीसांनी आनेक दारू विक्रेते, मटका व जुगार अड्डे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे यांचेवर कारवाई केली आहे.ही कारवाई तात्पुरती नसावी तर सातत्याने चालु राहणे गरजेचे असल्याचे मत शहरातील सर्वसामान्य नागरिक व युवा वर्गातुन होत आहे.

इंदापूर शहरात सध्या मटका व इतर अनेक अवैध धंदे सध्या जोरात सुरू आहेत. शहरातील आनेक ठीकाणी हे धंदे फोपावले असुन अशा धंद्यावर कायमस्वरूबी बंदी आणण्याबाबतचा तोडगा निघणे गरजेचे आहे. अशा या धंद्यामुळे शहरातील युवा पीढी वाममार्गाला लागुन बर्बाद होताना दिसुन येत आहे.तर अशा या धंद्यांच्या मुळे आनेक तरून युवक व्यसनाच्या आहारी जाऊन कर्जबाजारी होत आहेत व त्यातुनच शहरात मोठ्या प्रमाणात गुंडा गर्दीत देखील वाढ होऊन त्याचे पर्यावसन कीरकोळ व मोठ्या भांडणात होताना नागरीकांनी अनेकदा पाहीले व अणूभवलेले आहे.तरीपण अशा या अनैतिक धंदेवाल्यांना पाठबळ नक्की कोणाचे मिळते ? याचे चौकशी होणे खर्‍या अर्थाने गर्जेचे आहे.

मागील काही दिवसातील परिस्थितीचा विचार केल्यास इंदापूर शहरात गुन्हेगारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दीसून येत आहे. तर चोर्‍या व घरफोड्यांचेही प्रकारात वाढ होत असताना दिसुन येत असुन याला शहरातील अवैध धंदे कारणीभुत ठरत आहेत. झटपट पैसा कमाविण्याच्या नादात आनेक तरूण, युवक खोट्या अमिशाला बळी पडून अशा अवैध धंद्याच्या नादी लागुन गुंडागर्दी व वाममार्गाला लागुन आपले संपूर्ण आयुष्यच टांगणीला लावताना दीसून येत असुन सध्या शहरात राजरोसपणे सुरू असणारा मटका, हाॅटेल ढाब्यावर सुरू असणारी अवैध दारू विक्री, गुटखा विक्री अवैध प्रवाशी वाहतूक अशा अवैध धंद्यांना ब्रेक लावण्याचे संबधीत प्रशासनाने युद्धपातळीवर करणे गरजेचे असुन असे धंदे करणार्‍यांना पकडून त्यांचेवर वारंवार कारवाईचा बडगा उगारल्यास इंदापूर शहरातील अवैध धंद्यांना ब्रेक लागेल अन्यथा असे धंदे बिनबोभाटपणे फोफावल्यास शहरात मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढण्यास सुरूवात होइल याची संबधीत विभागांनी वेळीच काळजी घेवुन शहर अवैध धंदे मुक्त करण्याची मागणी सर्वसामाण्यांकडून करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com