तीस हजार रुपयांची लाच घेताना तलाठी मदतनीस अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

वडलोपार्जीत जमीन आईच्या नावावर करण्यासाठी तलाठ्याला मदत करणाऱ्या इसमाला तीस हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई अॅन्टी करप्शनच्या पथकाने शुक्रवारी (दि.२८) वडवणी ते चिंचवण रोडवर हॉटेल मेघराज परिसरात सापळा रचून केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7ae25e8-c304-11e8-9c7c-192a71a9302a’]

अशोक सदाशिव हजारे (वय-२६  रा. कासारी, ता. केज, जि. बिड) असे अटक करण्यात आलेल्या मदतनीसाचे नाव आहे. याप्रकरणी सज्जा खडकी येथील एका इसमाने अॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार दिली होती.

तक्रारदार यांची मौजे खंडोबाची वाडी येथे वडिलोपार्जीत जमीन आहे. ही  जमीन तक्रारदार यांना त्यांच्या आई व भावाच्या नावावर करावयाची होती. जमीन नावावर करण्यासाठी सज्जा खडकी येथील तलाठी यांचा मदतनीस अशोक हजारे याने ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने ५ सप्टेंबर रोजी अॅन्टी करप्शन कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरुन वडवणी येथे पंचासमक्ष लाच मागणी केल्याची खात्री पथकाला झाली.

पुणे : भाजप आ. मेधा कुलकर्णींच्या हँड बिलावर काँग्रेस चिटणीसाचे छायाचित्र

अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज  वडवणी ते चिंचवण रोडवर असलेल्या हॉटेल मेघराजच्या परिसरात सापळा रचला. अशोक हजारे याने तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.  अशोक हजारे याच्यावर डवणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de8259cd-c304-11e8-9ac7-3b98003ed8e6′]

ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस हवालदार दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, पोलीस नाईक विकास मुंडे, अमोल बागलाने, पोलीस शिपाई सखाराम घोलप यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन औरंगाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.