व्हाईट हाऊसच्या ज्या बंकरमध्ये होते ट्रम्प, त्यावर परमाणू हल्लादेखील होईल ‘निष्प्रभ’

नवी दिल्ली, वृतसंस्था : ब्लॅक अमेरिकन जॉर्ज फॉयडच्या मृत्यू नंतर अमेरिकेच्या बहुतेक राज्यांत हिंसाचार सूरू आहे. परिस्थिती अशी बनली की, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह अनेक शहरांमध्ये हिंसा नियंत्रित करण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला. अमेरिकेचे राषट्रपती ट्रम्प यांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाऊससमोर मोठ्या संख्येने निदर्शक एकत्र आले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबास सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना व्हाईट हाऊसमधील बंकरमध्ये नेले गेले, जेथे ते राहत आहेत. दरम्यान या बंकरची क्षमता जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल.

व्हाईट हाऊसमध्ये बांधलेल्या या बंकरमध्ये राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त सर्व कर्मचार्‍यांच्या मुक्कामासाठीही संपूर्ण व्यवस्था आहे. हा बंकर इतका शक्तिशाली आहे की, रॉकेट किंवा मिसाइलच नव्हे तर अणुबॉम्बने हल्ला केला तरी कोणाचेही नुकसान होणार नाही. या बंकरमध्ये अनेक गुप्त बोगदे आहेत, ज्याद्वारे अमेरिकन अध्यक्ष कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कोठेही जाऊ शकतील. या बोगद्याद्वारे ते कोणत्याही विभागाच्या कार्यालयांमध्ये पोहोचू शकतात. व्हाईट हाऊसच्या बंकरमध्ये, राष्ट्रपतींसाठी दिवाणखाना, टीव्ही, कॉन्फरन्स रूम व्यतिरिक्त कमांड रूम देखील आहे जिथे ते कधीही 16 लोकांसोबत बैठक घेऊ शकतात.

पाच मजली इंटेलिजेंस बंकरमध्ये राष्ट्रपतींच्या कारसाठी पार्किंग आणि गॅरेजही आहेत, ज्यात त्यांच्या ताफ्यांची वाहने सुरक्षित ठेवता येतील. दरम्यान, 25 मे रोजी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड नावाच्या काळ्या नागरिकाला गाडीतून खाली उतरवून पोलीसांनी त्याला जमिनीवर झोपवून घूडघ्याने त्याची मान दाबली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथे भेदभावाबद्दल निदर्शने सुरू झाली. नंतर काही ठिकाणी हिंसाचारही दिसून आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like