WHO Global Center | जगभरात होणार आयुर्वेदाची वाहवा, अर्थसंकल्पात तरतूद; आता भारतात उभारणार पहिले WHO-ग्लोबल सेंटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WHO Global Center | कोरोना महामारीच्या (Coronavirus) आगमनानंतर भारतातील प्राचीन वैद्यकीय पद्धतींची मागणीही जगात वाढली आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील देशांनीही या महामारीमध्ये आयुर्वेदाच्या उपायांचा (Ayurvedic Treatment) मोठ्या प्रमाणात वापर केला आणि त्याचे आरोग्यदायी फायदेही झाले. आयुर्वेदिक औषधांपासून, घर आणि घराबाहेर असलेल्या वनस्पती आणि झाडांचा वापर करण्यात आला. (WHO Global Center)

 

आयुर्वेदाबाबत आता भारतात मोठे काम केले जाणार असल्याने त्यामुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाची स्वीकारार्हता तर वाढेलच, शिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत या वैद्यकीय पद्धतीचे नवीन संशोधन, आणि प्रसार करण्याची संधीही मिळेल. यावेळी, भारत सरकारने जारी केलेल्या 2022 च्या अर्थसंकल्पात, WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी त्यावर काम सुरू होणार आहे. (WHO Global Center)

 

डब्ल्यूएचओने 2020 मध्येच भारतामध्ये जगातील पहिले डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन (Global Centre for Traditional Medicine in India) च्या स्थापनेबाबत घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकारने आयुष मंत्रालयासाठी 3050 कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे पारंपारिक औषधे विशेषत: आयुर्वेदासाठी हे जगातील पहिले आणि एकमेव डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर असेल. त्याचा थेट परिणाम देशातील पारंपारिक औषध क्षेत्राला चालना देण्यावर तसेच त्यामधील गुंतवणुकीवर दिसून येईल.

यामुळे आयुर्वेद हा एक उत्तम वैद्यकीय पर्याय म्हणून उदयास येईलच, शिवाय जागतिक वैद्यकीय क्षेत्रात भारताची विशेष ओळख निर्माण होईल. आता भारतापुरती मर्यादित असलेल्या या वैद्यकीय पद्धतीत परदेशी सहकार्यही वाढणार आहे. यासोबतच आरोग्य क्षेत्रातील आयुर्वेदाचे फायदे इतर देशांनाही मिळतील.

 

WHO-Global Center for Traditional Medicine in India हे विशेषत: भारतात पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या औषध प्रणालीचा विस्तार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र असेल. आयुर्वेद ही भारतामध्ये प्राचीन काळापासून अवलंबलेली वैद्यकीय पद्धत आहे. आयुर्वेदाबाबत इतर देशांची फार पूर्वीपासून विशेष आस्था आहे, मात्र आता डब्ल्यूएचओने सुद्धा याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस म्हणाले होते की आयुर्वेदासारख्या पारंपारिक औषध पद्धतींचा लोकांच्या आरोग्याच्या काळजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे, परंतु त्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. आयुर्वेद पुराव्यावर आधारित असल्याने ही पारंपारिक औषधी पद्धत अतिशय उपयुक्त आहे.

 

त्याच वेळी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले होते की भारताच्या या पारंपारिक संपत्तीचा उर्वरित जगालाही फायदा होऊ शकतो.

 

आयुर्वेदाची माहिती पुस्तके आणि हस्तलिखितांमधून बाहेर आणण्याबरोबरच,
घरगुती उपचाराने आधुनिक गरजा पूर्ण होतीलच शिवाय प्राचीन वैद्यकीय ज्ञान क्षेत्रात भारतात होत
असलेल्या नवीन संशोधनालाही मदत होईल. अशा स्थितीत भारतात उभारले जाणारे हे जागतिक केंद्र आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

 

कोरोना महामारीच्या काळातच भारतातून आयुर्वेदिक उत्पादनांची (Ayurvedic Products) निर्यात सुमारे 45 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये हळद, आले, भारतातील मसाले, आयुर्वेदिक इम्युनिटी बुस्टरची मागणी होती.
अशा स्थितीत एकीकडे कोरोना लसीकरण (Vaccination) आणि दुसरीकडे आयुर्वेदिक उपाय जगाने अवलंबले आहेत.
त्यामुळे या केंद्राच्या निर्मितीनंतर या दिशेने बरीच प्रगती अपेक्षित आहे.

भारतात अगोदरपासूनच आयुर्वेदावर काम
भारतात आयुर्वेदावर खूप काम केले जात आहे. आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांव्यतिरिक्त,
NSRIR आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद दिल्ली शिवाय गुजरात आणि
राजस्थानमध्ये दोन नवीन आयुर्वेद संस्था अपग्रेड करण्यात आल्या आहेत.

 

एवढेच नाही तर शिक्षण मंत्रालय आणि यूजीसीला पंतप्रधानांकडून आयुर्वेद भौतिकशास्त्र आणि
आयुर्वेद रसायनशास्त्रातील नवीन संधी शोधण्यास सांगितले आहे.

 

Web Title :- WHO Global Center | who global center for traditional medicine will be established soon as budget is allotted for ayush ministry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 2 हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर FIR; कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ

 

Bandatatya Karadkar | ‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात’; असं म्हणणार्‍या बंडातात्या कराडकरांचा माफीनामा

 

Pune Yerwada Building Collapse | शास्त्रीनगर दुर्घटना ! बांधकामाला ‘स्टॉप वर्क’; दुर्घटनेच्या चौकशीसाठी 10 सदस्यीय समिती स्थापन