टिक-टॉक..टिक-टॉक..टिक-टॉक ! चॅट व्हिडीओनं वाढवले इम्रान खान सरकारच्या ह्दयाचे ‘ठोके’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे प्रतिष्ठीत मंत्री, अधिकारी आणि नेत्यांच्या हृदयाची धक धक वाढली आहे. टिकटॉकमुळे पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप आला आहे. टिकटॉकवर व्हिडिओ तयार करुन कायम चर्चेत असणाऱ्या दोन सुपरस्टारचा एक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे इमरान सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या दोघी टिकटॉकस्ट्रार हरीम शाह आणि सुंदल खट्टक आहेत. यातील हरीम शाह हिने परराष्ट्र मंत्रालयात फिरतानाचे फोटो असतील किंवा रेल्वे मंत्री रशीद शेख यांच्याबरोबरीच पर्नल चॅट. यामुळे पाकिस्तान सरकार आता अडचणीत आले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात हरीम –
सोशल मीडियावर टिकटॉकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हरिम शाह व्हिडिओ तयार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ परराष्ट्र मंत्रालयाच्या कॉन्फ्रेंस रुममधील आहेत. जेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होते. हरीम एका खुर्चीवर जाऊन बसली आहे, ज्यामागे मोहम्मद जिन्ना यांचा फोटो आहे.
सोशल मिडियावर काही लोक दावा करत आहेत की हा पंतप्रधान इमरान खान यांच्या हॉलमधील फोटो आहे. जेथे ते कॅबिनेट बैठक घेतात. परंतु पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून या प्रकरणी आता तपास सुरु केला आहे की, हरीम शाह इथं पर्यंत कशी पोहचली.

कॉन्फ्रेंस रुमपर्यंत कशी पोहचली हरीम –
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला देण्यात आलेल्या मुलाखतीत हरीम शाहानी या प्रकरणी उत्तर दिले. ती म्हणाली की, त्यांच्यासाठी ही काही मोठी बाब नाही, ती एक प्रेक्षक म्हणून ह्या खोल्या पाहायला गेली होती.

हरीम शाहने सांगितले की, ती नॅशनल असेंबलीला देखील गेली होती. आणि तिला कोणीही रोखले नाही. पाकिस्तानी मीडियामध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, तेथे एक प्रेक्षक म्हणून आली होती. परंतु कॉन्फ्रेंस रुमपर्यंत ती एखाद्या स्टॉफच्या मदतीने पोहचली असावी.

व्हायरल होत आहे पाकिस्तानी मंत्र्यासोबतची सेक्स चॅट –
हरीम शाह तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात ते पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांच्याबरोबर व्हिडिओ चॅट करत होती. या व्हिडिओमध्ये ती त्यांच्यावर रागवत होती. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, मी आज पर्यंत तुमचे कोणतेही पितळ उघडे केले नाही,…. तुम्ही व्हिडिओमध्ये अनेक वाईट वाईट हरकती करत होते.
मागील एका आठवड्यापासून हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये सोशल मिडियावर फिरत आहे. त्यामुळे इमरान खान यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु या दरम्यान मंत्री शेख रशीद हज यात्रेसाठी गेले आहेत. ते त्यांच्या सोशल मिडियावर मक्कामधील फोटो शेअर करत आहेत. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनीच भारताविरोधात युद्धाची धमकी दिली होती.

सुंदल खट्ट्क बरोबर देखील व्हिडिओ –
सुंदल खट्टक एक पाकिस्तानी टिकटॉक स्टार आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात रशीर सुंदलला म्हणत आहे की, मी सध्या एका कार्यक्रमात आहे, नंतर बोलू.

कॅनडाचे नागरिक बनू इच्छित आहे हरीम –
पाकिस्तानने कायम सुरु असलेल्या वादामुळे हरीम शाह चर्चेत आली. फक्त नेता किंवा मंत्रीच नाही तर बाकी पाकिस्तानी पत्रकार, सेलेब्रिटी देखील तिच्या व्हिडिओमधून समोर येत आहे. यानंतर हरीमकडून आरोप लावण्यात आला की, तिला धमक्या मिळत आहेत आणि लक्ष बनवले जात आहे.
आता मिडियामध्ये वृत्त येत आहे की, हरीम शाहला कॅनडाचे नागरिकत्व हवे आहे. तिने त्यासाठी अर्ज केला आहे. हरीम शाह अजेरबाईजानमध्ये आहे आणि तेथून तिने कॅनडाच्या नागरिकत्वसाठी अर्ज केला आहे. तिने सांगितले की काही लोक सोशल मीडियावरुन काही फेक अकाऊंट तयार करुन काही फोटो व्हायरल करत आहेत आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

टिकटॉकवर सुपरस्टार आहे हरीम शाह –

भारताबरोबरच सध्या पाकिस्तानात देखील सोशल टिकटॉकचा बोलबाला आहे. हरीम शाह या अ‍ॅपवर सतत काहीना काहीतरी व्हिडिओ शेअर करत असते आणि ती एक सुपरस्टार आहे. तिचे 20 लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आणि 3 कोटीपेक्षा जास्त व्हिडिओ लाइक आहेत. हरीम शाहच्या टिकटॉक अकाऊंटवर नजर टाकली तर लक्षात येईल की व्हीआयपीबरोबर ती दिसली आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/