भारतात अद्याप ‘कोरोना’चा ‘उद्रेक’ नाही झालेला, परंतु ‘धोका’ कायम : जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग इतर देशांपेक्षा कमी झाला आहे, परंतु त्याचा उद्रेक होण्याचा धोका अजूनही कायम आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की कोरोनाचा उद्रेक अद्याप भारतात झालेला नाही.

डब्ल्यूएचओचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रम अधिकारी मायकल रेयान यांनी शुक्रवारी जिनिव्हामध्ये सांगितले की, सध्या भारतातील दुप्पट दर सुमारे 3 आठवडे आहे. ते म्हणाले की साथीच्या आजाराची दिशा अद्याप घातक नाही परंतु हे प्रमाण वाढत आहे. ते म्हणाले की भारतातील साथीच्या आजाराचा परिणाम देशाच्या विविध भागात वेगवेगळा आहे. तसेच रेयान म्हणाले की, भारतात घेतलेल्या उपायांचा साथीचा आजार थांबविण्यावर निश्चितच परिणाम झाला आहे आणि भारतासारख्या इतर मोठ्या देशांमध्ये लोकांची लॉकडाऊन पासून सुटका झाल्यावर या आजाराची शक्यता अजून वाढत जाईल.

दक्षिण आशियाविषयी बोलताना मायकल रेयान म्हणाले की बांग्लादेश आणि पाकिस्तानसह अधिक लोकसंख्या घनता असणाऱ्या इतर देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला नाही, परंतु या देशांमध्ये तो धोका अजूनही आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 9,887 प्रकरणे समोर आली आहेत. एकूण रूग्णांच्या संख्येविषयी बघितले तर हा आकडा 2,36,657 च्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशात 6,642 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे आकडे सातत्याने वाढतच आहेत.