‘या’ प्रमुख 3 कारणांमुळं अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला ? चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपने अचानक सत्तास्थापन केल्याने राष्ट्रवादीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. एकीकडे महाविकासआघाडी सत्तास्थापनेच्या प्रयत्नात होती. परंतू त्याआधीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतू असे अचानक काय झाले की अजित पवारांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपसोबत जावे लागेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते म्हणजे अजित पवारांचे हे बंड स्वप्रेरणेने आहे ? की त्यांनी कोणी फूस लावली ?

कालपर्यंत विरोधक म्हणून भूमिकेत असलेलेल अजित पवार आज अचानक भाजपच्या जवळ कसे गेले. असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. त्यांच्या या भूमिकेमागे काही काळंबेरं आहे का असा सवाल उपस्थित केला गेला.

1) अजित पवारांचे बंड
काही दिवसांपासून अजित पवार अस्वस्थ दिसत होते. त्याआधी देखील त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. सत्तास्थापनेस लागणारा वेळ याचीच संधी साधून अजित पवार यांनी भाजप बरोबर गेले असे सांगण्यात येत आहे.

2) धमकीमुळे पवार भाजपसोबत
काही दिवसापासून अजित पवार यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला होता. भाजपने निर्णय घेतला होता की अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची चौकशी लावली होती. त्यामुळे अजित पवार यांना धमकी देण्यात आली आहे का ? याची चर्चा सुरु झाली.

3) अजित पवार यांनी फूस लावण्याचा प्रयत्न
अजित पवारांचे बंड हे शरद पवारांचे राजकीय धोरण असू शकते असा आरोप केला जात आहे. पवारांचा राजकारण समजून घेणे अवघड असल्याचे बोलले जाते. सत्तेचा घोळ सूटत नसल्यानेच पवारांनी हा खेळ खेळला जात असल्याचे बोलले जात आहे.

अर्थात राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असे नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. कारण राजकारण हा नंबरचा गेम मानला जातो.

Visit : Policenama.com