एकाच प्रोफेशनमधील कपल्स जास्त आनंदी आणि समाधानी का असतात ? काय आहे याचा फायदा ?

पोलीसनामा ऑनलाईन :अनेकांना माहिती नसेल परंतु एकाच प्रोफेशनमध्ये असलेले कपल जास्त आनंदी आणि समाधानी असल्याचं आढळून आलं आहे. याचे नेमके काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

1) संवाद संपत नाही- असं म्हणतात की, एकाच प्रोफेशनमधील कपल्स परफेक्ट कपल असतात. एकच फिल्ड असल्यानं अशा कपल्समधील संवाद संपत नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप असतं. ते प्रेझेंटेशन, एकमेकांच्या कामाचे अनुभव यावर देवाण घेवाण करू शकतात.

2) समजून घेणं सोपं होतं- जर कपल एकाच फिल्डमधील असेल तर समजून घेणं सोंप असतं. एकमेकांच्या अडचणी कळतात. कधी कधी प्रोफेशन एक असेल तर असंही होतं की, जलसी वाटण्याचे प्रकार घडतात. परंतु शेवटी पार्टनरच्या समजूतदारपणावर सारं काही असतं.

3) फॅमिली प्लॅनिंग- जर प्रोफेशन एक असेल तर पार्टनर एकमेकांना जास्त सपोर्टीव असतात. अडचणीच्या परिस्थितीतही चांगल्या प्रकारे मार्ग काढता येतो. गोल्स, करिअर घरातील जबाबदाऱ्या याबद्दल खुलेपणानं निर्णय घेता येतात. फॅमिली प्लॅनिंगही चांगल्या प्रकारे करता येतं.

शेवटी कपल्सचं प्रोफेशन कुठलंही असलं तरी नात्यातील समजूतदारपणा आणि प्रेम व विश्वास यावर नातं अवलंबून असतं हेही तितकंच खरं आहे.