एकता कपूरच्या मालिकांमध्ये का असतो सासू-सुनेचा ड्रामा ? व्हिडीओतून केला ‘खुलासा’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडची दिग्गज फिल्म प्रोड्युसर एकता कपूर आज वेगवेगळे जॉनर ट्राय करत आहे. परंतु लोकांना चांगलं माहिती आहे की, सुरुवातीला तिनं कशा प्रकारे डेली सोपनं सुरुवात केली होती. ती फॅमिली ड्रामावर शोज बनवत असे. तिचे शो खूप लोकप्रिय देखील होत असे. लॉकाडऊनमध्ये आता एकतानं तिचा एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे जो तिचा हावर्ड युनिव्हर्सिटीतल्या दिवसांचा आहे. तिनं सांगितलं की, कशा प्रकारे तिला लोकांच्या वागणुकीतील बारकावे पहायला आवडतं.

व्हिडीओत एकता म्हणते, “मला लोक आवडतात. तसं तर मी खूप प्रायवेट आहे. परंतु लोकांच्या वागण्यावर फोकस करायला आवडतं. मी बघते ते कसं जगतात. अनेक लहान गोष्टी मी पहात असते. मी कधीच जॉईंट फॅमिलीत नाही राहिले. परंतु जेवढे शोज केले ते सारे जॉईंट फॅमिलीतले केले.”

स्पष्ट आहे की, एकताच्या शोमध्ये काही प्रमाणात खरी वर्तणुकही दाखवली जाते. बऱ्याच प्रमाणात काही काही काल्पनिक असतं. एकता कॅप्शनमध्ये म्हणते, “2013 साली मी #OPM कोर्ससाठी हावर्डला गेले होते. जेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांनी मला इंटरव्ह्युसाठी विचारलं. ही एक छोटी क्लिप आहे. मी खूप काही शिकले आहे. खूप सारे केस स्टडी केले आहेत.”