PM मोदींच्या आवाहनानंतर Lockdown बाबत CM उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे ‘लक्ष’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. वाढती बाधितांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणाही आता अपुरी पडू लागली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात आज रात्री पासून लॉकडाऊन लागण्याची चर्चा लागली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बाधितांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना सुरु आहे. मात्र, सर्वच राज्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन नको, असा सल्ला दिला आहे. केंद्राकडून लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा असे सांगितले जात आहे तर राज्यात आतापासूनच लॉकडाऊन लावण्याचा हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत राज्यसरकार आपला निर्णय रद्द करणार की कायम ठेवणार याकडे लक्ष लागले.

कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे ४० टक्के रुग्ण आहेत.मृत्यूचेही प्रमाण येथेच अधिक आहे. ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरची कमतरता भासत असल्याने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावावा याबाबत सर्वच मंत्र्यांनी भूमिका घेतली. यावर आज मुख्यमंत्री आज निर्णय घेणार आहेत. दरम्यान ही घोषणा होते न होते तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊन देशाला परवडणारे नाही, त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. औद्योगिक दृष्टीने महाराष्ट्र हे सर्वात मोठ राज्य आहे, तसंच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन झाला तर त्याचे आर्थिक पडसाद सर्वच राज्यात दिसू लागतील हे नक्की. राज्य सरकारवर उद्योगपती, परराज्यातील कामगार या सर्वांचं दडपण राहणार आहे. त्यामुळे राज्यसरकार स्वतःचा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणार का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.