महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणार्‍या लोकांना देखील तब्बल ‘इतके’ दिवस व्हावं लागणार होम क्वारंटाईन, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही सांगितले कि, देशाला कोरोनाबरोबर राहायला शिकावे लागेल, कारण दुसरा कोणताही पर्याय नाही. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना सात दिवसांच्या अनिवार्य संस्थात्मक क्वारंटाईनपासून सूट दिली आहे. आता त्यांनाही इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांप्रमाणेच 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल. विधानसभेत बाबू जगजीवन राम यांना परिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना येडियुरप्पा यांनी सोमवारी सांगितले कि, ‘आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही. आपल्याला कोरोनाबरोबर रहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असेच म्हटले आहे. आम्ही रुग्णवाहिकांची संख्या वाढविली आहे. आम्ही कोरोना संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी सर्व तयारी केली आहे. आपण स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. ‘

दुसरीकडे, राज्य वित्त सचिव (आपत्ती व्यवस्थापन) आणि राज्य कार्यकारी समितीचे सदस्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांच्या आदेशानुसार, ‘महाराष्ट्रासह इतर कोणत्याही राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या लोकांना 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनसाठी पाठवले जाईल.’ यापूर्वी सरकारने दिल्ली आणि तामिळनाडूहून येणाऱ्या लोकांना तीन दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईनमध्ये सवलत दिली होती. दोन्ही राज्यातून येणा-या लोकांसाठी 14 दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभागाने जारी केलेल्या इतर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 23,474 आहे, त्यापैकी 9847 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत आणि सध्या राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 13215 झाली आहे. राज्यात कोरोना संसर्गामुळे 372 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तसेच, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 6,79,413 झाली आहे. यापैकी 2,53,287 सक्रिय प्रकरणे आहेत, 4,24,433 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. तर 19,693 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत 24,248 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर याकाळात 425 लोकांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, 60.85 टक्के रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. या दरम्यान, कोरोना विषाणूची 1,80,596 नमुने चाचणी घेण्यात आली. 5 जुलै पर्यंत एकूण 99,69,662 नमुने चाचण्या घेण्यात आल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याची माहिती दिली आहे.

दरम्यान, देशात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत राज्यात 206619 रूग्ण नोंदले गेले असून 8822 लोकांचा मृत्यू झाला आहे. नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी 86,057 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 11,1740 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. तामिळनाडूमध्ये 1,11,151 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. यापैकी, 46,863. सक्रिय प्रकरणे असून 62,778 रुग्ण बरे झाले असून 1510 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनतर दिल्लीत 99,444 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 25,038 सक्रिय प्रकरणे आहेत. 71,339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 3067 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात 27,707 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी 8161 सक्रिय प्रकरणे असून 18,761 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 785 लोक मरण पावले आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या बाबतीत भारत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणी आज भारताने रशियाला मागे टाकले. यासोबतच दररोजच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये रुग्णांच्या रिकव्हरी रेटचे प्रमाणही सतत वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी माहिती दिली की, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा 60.77 टक्क्यांहून अधिक आहे.