‘फोर मोर शॉट्स प्लीज’च्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार करीना आणि तिची गर्ल गँग ? प्राईम व्हिडीओच्या ऑफरवर ‘बेबो’ म्हणते…

पोलिसनामा ऑनलाइन –देशातील लॉकडाऊन आता 3 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे. अशात आता बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओ यांच्यातील मजेदार बातचित समोर आली आहे. ज्यात करीनानं फोर मोर शॉट्स या सीरिजमधील 3 सीजनबद्दल मजेदार कमेंट केली आहे.

करीना कपूरनं तिच्या गर्ल गँगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात करीना आणि तिची मोठी बहिण करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि तिची लहान बहिण अमृता अरोरा दिसत आहेत. ही गर्ल गँग खूप फेमस आहे. करीना अनेकदा या गँगसोबत मस्ती करताना दिसत असते. फोटो शेअर करताना करीना म्हणते, “आम्ही चार लोकांच्या टेबलवरून चार वेगवेगळ्या टेबलावर गेलो आहोत. आपल्या गर्ल गँगपासून एवढ्या मोठ्या वेळेसाठी दुरावा नाही सहन करू शकत.”

https://www.instagram.com/p/B_CjjSdJtK_/

या फोटोला फोर मोर शॉट्स या सीरिजला कनेक्ट करत प्राईम व्हिडीओच्या अकाऊंटवरून कमेंट करण्यात आली की, सर्वांना एक वेगळा शो का हवा आहे ?” यावर करीना चिमटा काढत म्हणते, “मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही फोर मोर शॉट्स चा तिसरा सीजन करण्याचा सल्ला देता. बरोबर ना ?”

https://www.instagram.com/p/B_CD4m3DBC8/

अलीकडेच फोर मोर शॉट्स प्लीजच्या दुसऱ्या सीजनचा ट्रेलर रिलीज झाला. सयानी गुप्ता, किर्ती कुल्हारी, बानी जे, मानवी गगरू, लिसा रे, प्रतिक बब्बर मिलिंद सोमन आणि इतर कलाकारांनी अभिनीत या शोची निर्मिती प्रितीश नंदी कम्यनिकेशन्स लिमिटेडनं केली आहे. या सीजनचं डायरेक्शन नुपुर अस्थाना हिनं केलं आहे.

2019 च्या सुरुवातीला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रसारीत झालेल्या सीरिजमध्ये चार अनोख्या मुलींची ओळख करून देण्यात आली होती. या मुली स्वप्ननगरी मुंबईत दोस्ती, टकीला शॉट्स आणि जगण्यासोबतच प्रेम करत आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात.

https://www.instagram.com/p/B1ab7o7hYxX/

https://www.instagram.com/p/B-0knw6pRxQ/

https://www.instagram.com/p/B-mukKSp6BZ/

https://www.instagram.com/p/B8I_YBVJl5o/

https://www.instagram.com/p/B_A3YWvDF29/

https://www.instagram.com/p/B9aqCWlJeQN/