‘विप्रो’चे CEO आबिद अली झेड नीमचवाला यांचा ‘राजीनामा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – विप्रो कंपनीचे सीईओ आबिद अली झेड नीमचवाला यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी सूचना त्यांनी विप्रो बोर्डाला दिली आहे. विप्रो बोर्ड नवीन सीईओचा शोध घेत असून तोपर्यंत नीचमवाला हे सीईओ पदावर राहतील, असे सांगितले जात आहे. कौटुंबिक कारणावरुन नीमचवाला हे सीईओ पद सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतातील तिसरी मोठी आयटी कंपनी विप्रोने नीमचवाला यांनी १ फेब्रुवारी २०१६ मध्ये सीईओपदी नियुक्ती केली होती. विप्रोत येण्यापूर्वी नीमचवाला यांनी टाटा कन्सल्टन्सीमध्ये २३वर्षे काम केले होते. नीमचवाला यांची नियुक्ती करताना विप्रोने प्रथमच कंपनीच्या बाहेरील आणि प्रतिस्पर्धी कंपनीमधील व्यक्तीची सीईओपदी नेमणूक केली होती. गेल्या चार वर्षात विप्रोने जागतिक बाजारपेठेत आपली छाप कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.