अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या महिलेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर भागात मॅफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या महिलेला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. तिच्या ताब्यातून 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नसरिन अब्दुलरब कुरेशी (वय 60, रा. न्यू मोदीखाना) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक लष्कर भागात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना ही महिला संशयास्पदरित्या आढळून आली. तिची महिला पोलिसांच्या मदतीने झडती घेण्यात आली. त्यावेळी महिलेकडे 26 ग्रॅम एमडी व रोख 1 लाख 40 हजार रुपये आढळून आले. या महिलेने हा अमली पदार्थ कोठून आणला आहे. ती कोणाला विक्री करत होती. याचा तपास सुरू आहे.