‘माता तू न वैरी’ ! नवजात अर्भकाला पुलाखाली फेकून महिलेचा ‘पोबारा’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘माता तू न वैरी’ या उक्तीला साजेशी घटना आज (रविवारी) सकाळी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावाजवळील वर्षी रस्त्यावरील सूर नदी पुलाखाली घडली. नुकतेच जन्मलेले बाळ (मुलगी) एका पिशवीत ठेऊन महिला निघुन गेली. काही वेळाने बाळ रडायला लागले. पुलाखालून रडण्याचा आवाज येत असल्याने शेळी चारणाऱ्या रखावलदाराने त्या दिशेने जात पाहिले तर पिशवीत लहान बाळ दिसले. पुलाखाली पिशवीत बाळ आहे. हि वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली.

शिंदखेडा पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पो.नि.दुर्गेश तिवारी, PSI सय्यद, WPSI गिंताजली सानप, पो.कॉ.मिलिंद सोनवणे, आबा भिल, तुषार पोतदार कैलास महाजन यांनी सदर ठिकाणी जावुन पहाणी करुन बाळास तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी तपासणी करुन सांगितले.

हे बाळ कोण पुलाखाली सोडून गेले याबाबत कोणीच पाहिलेले नाही. हे बाळ कोणाचे, कोणी असे केले याबाबत परिसरात उलसुलट चर्चेला उधाण आले आहे. शिंदखेडा पोलीस हे बाळ पुलाजवळ कोण सोडून गेले, याबाबत माहिती घेत तपास करत आहे.

‘केळी’ आरोग्यासाठी फायदेशीर 

ज्वारीची भाकरी ‘या’ आजारांवर ठेवते नियंत्रण 

पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे दुर्लद्व ; करा ‘हे’ उपाय

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

आदिवासी मुलांकडून प्रवेशासाठी पैसे घेत असल्याची तक्रार