पती सर्वगुणसंपन्न तरी देखील पत्नीनं का दिला ‘तलाक’ ?

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – लग्नाप्रमाणेच सध्या घटस्फोटाची प्रकरणे देखील मोठ्या संख्येने वाढत आहेत. घटस्फोटानंतर काही जण आयुष्यात पुढे जातात तर काही जण पश्चताप करत बसतात. चीनच्या महिलेने आपल्या घटस्फोटाची कहाणी सांगितली आहे जी अनेकांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. 32 वर्षीय जीआयूने सांगितले की, ती दोन वर्षांपूर्वी आपल्या पतीला भेटली होती. ते दोघेही एकाच कॉलेजात आणि एकाच ठिकाणी काम करत होते त्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघे एकाच घरामध्ये राहू लागले.

नवरा जिआयुचे खूप लाड करत असल्यामुळे ती सर्व काही तिच्याच म्हणण्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असे मात्र नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत गेले यासाठी देखील तिच्या नवऱ्यानेच तिच्याकडे आपण चांगला पती होऊ शकलो नाही म्हणून माफी मागितली.

जिआयुला असे वाटत होते की नवऱ्याने परत तिच्याकडे येऊन तिला विचारावे मात्र आता प्रकरण हातातून निघून गेले होते. जिआयु एकदा डेटवर गेली असता तिला तिचा नवरा तिची किती काळजी घ्यायचा याची आठवण झाली आणि ती रडू लागली त्यानंतर एका व्यक्तीने तिला डोळे पुसण्यासाठी टिशू दिला. तिने पहिले तर तो व्यक्ती तिचा पती होता.

जिआयुने पुढे लिहिले की, मी त्याला दोन वर्षानंतर पाहत होते त्यामुळे मला त्याला विचारायचे होते की आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का ? मात्र इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो म्हणाला एक मिनिटात आलो. जिआयु ने तो गेल्यावर पहिले की, एक सुंदर महिला त्याची वाट पाहत उभी होती. दुसऱ्या महिलेसोबत त्याला पाहून जिआयु नाराज झाली. तेव्हा तिला आपण काहीतरी गमावले असल्याची जाणीव झाली.

शेवटी जिआयु लिहते, घटस्फोटानंतर मी अनेकांसोबत डेट वर गेले परंतु त्यातील कोणी देखील माझ्या नवऱ्यासारखे नव्हते. त्यामुळे माझा नवराच माझ्यासाठी योग्य होता असे मला वारंवार वाटते असे स्पष्ट मत जिआयुने आपल्या लिखाणाद्वारे व्यक्त केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like