महिलेनं WhatsApp कॉल करून तरूणाचा बनवला Nude Video

पोलिसनामा ऑनलाईन – व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून महिलेने एका तरुणाचा नग्न व्हिडिओ शुट केला. त्यानंतर त्याला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 37 हजार रुपयांना गंडवल्याची घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भायंदर भागात ही घटना घडली आहे.

भयंदर परिसरात राहणार्‍या पीडित तरुणाला गेल्या महिन्यात एका अज्ञात महिलेने व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. नंतर संबंधित महिला ही तरुणाला वारंवार कॉल करू लागली. एके दिवशी महिलेने तरुणाला व्हिडीओ कॉल करून न्यूड होण्यास सांगितले. तिने नकळत तरुणाचा न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. दुसर्‍या दिवशी तरुणाला त्याचा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.

पीडित तरूण एका खासगी संस्थेत नोकरी करतो. आरोपी महिला वारंवार कॉल करून तरुणाला पैशांसाठी धमकावत होती. पैसे दिले नाही तर सुरतमध्ये (गुजरात) न्यूड व्हिडिओ व्हायरल करेन, अशी महिला धमकी देत होती. कोरोना काळात वर्क फॉर्म होम करणार्‍या पीडित तरुणाने आरोपी महिलेला 37 हजार रुपये दिले. आरोपी महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने अखेर पोलिसांत तक्रार दिली आहे.