खळबळजनक ! ‘कोरोना’बाधित महिलेला हॉस्पीटलला घेऊन जाताना चालकानं रूग्णवाहिकेतच केला बलात्कार

टनमिट्टा/ केरळ : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंतेचे ढग होत असल्याचे दिसत असून, त्यातच काही मणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनाही घडत आहेत. कोरोना केंद्रांमध्ये अत्याच्यार झाल्याच्या घटना दिल्ली, मुंबईत घडल्याचं समोर आलं होतं. केरळमध्येही अशीच घटना घडली असून कोरोना बाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेच्या चालकाने महिलेवर बलात्कार केला. ही घटना पटनमिठ्ठाच्या अरममुला परिसरात घडली असल्याची माहिती देण्यात येत आहे.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वय 19 असून पोलिसांनी आरोपी रुग्वाहिका चालकाला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीसह रुग्णवाहिकेमध्ये आणखी एक रुग्ण होता. त्याला आधी उतरवलं आणि त्यानंतर तो एका अज्ञात स्थळी गेला. तरुणीला रुग्णवाहिकेत एकटं पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं. देशात कोरोना संक्रमणाचा प्रकोप होत आहे. अशातच ही घटना म्हणजे संपूर्ण व्यवस्थेसमोर प्रश्न आहे.

तरुणीला कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर आरोपी चालकाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आधीच देशात कोरोनाचा धोका वाढतोय यातून अशा घटना घडत असल्यामुळे आणखी संभ्रम वाढत आहे. आजही देशात कोरोनाच्या रुग्णांनी सर्व रेकॉर्ड मोडले. रोज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची नवीन संख्या समोर येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी विक्रमी 90 हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर आता गेल्या 24 तासात 90 हजार 632 अशी कोरोना रुग्णांची नवी आकडेवारी समोर आली आहे.