साप पाहून महिलेनं केला ‘आरडा-ओरडा’, जेव्हा स्पर्श केला तेव्हा झाली ‘चकित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर नेहमीच सापासंबंधित काही फोटो शेअर करण्यात येत असतात. कधी माणसं जीव धोक्यात घालून सापांबरोबर खेळताना दिसतात. कधी आपल्या गळ्यात लटकवताना दिसतात. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होतं आहे ज्यात एक महिला सापाला पाहून किंचाळते परंतू जेव्हा जवळ जाऊन पाहते तर तेव्हा आश्चर्यचकित होते.
Image result for फातिमा दाऊद
फेसबूक यूजर फातिमा दाऊद यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की लांबून सापाला पाहून मी पहिल्यांदा जोरात किंचाळले. यानंतर त्यांना वाटले की साप त्यांच्या जवळ येत आहे.

परंतू जवळून जेव्हा पाहिले तेव्हा सापाचे सत्य उघड झाले. खरतर हा साप नाही तर जमिनीवर पडलेली एक खोटी वेणी होती, जी त्यांना सापासारखी दिसली. फातिमा दाऊद यांनी लिहिले की ती एका महिलेची खोटी वेणी होती.

फातिमा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की मी त्या महिलेची माफी मागू इच्छिते जी माझ्या बाजूला उभी होती. कारण ती जेव्हा ओरडली होती तेव्हा ती महिला त्याच्या बाजूला उभी होती. फातिमा यांनी सांगितले की ती महिला तिच्या ओरडण्याने घाबरली होती.

Visit : Policenama.com