दारु पिऊन पोलिसाचा धिंगाणा, महिला सहकार्याला शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  दिघी येथील पोलीस ठाण्यात दारू पिऊन आलेल्या पोलिसाने महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी अंमलदार म्हणून ड्युटीवर होते. तर आरोपीला चऱ्होली या ठिकाणी गस्त घालण्याची ड्युटी देण्यात आली होती.

त्या दिवशी आरोपी हा ड्युटीवर जाण्याच्या ऐवजी दारू पिऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने फिर्यादी महिलेबरोबर बाचाबाची करून शिवीगाळ केली.तुला कोरोना होईल असे अश्लील शब्द वापरून त्याने धिंगाणा घातला. सुमारे दोन ते तीन तास हा धिंगाणा सुरु होता. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.