४ हजार रुपयाची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तक्रार मागे घेण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भद्रावती येथील महिला पोलीस उपनिरीक्षाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी नागपूर लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. शुभांगी गुणवंत ढगे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे तक्रारदाराने पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांची भेट घेऊन विचारणा केली. परंतु, आरोपींवर गुन्हा दाखल करणे आणि मोबाईल परत देण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी ढगे यांनी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीमध्ये चार हजार रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी करुन सापळा रचला. शासकीय निवासस्थानात पंचासमक्ष शुभांगी गुणवंत ढगे यांना चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

ही कारवाई नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक दुद्दलवार, पोलीस उपअधीक्षक विजय माहूरकर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पुरूषात्तम चोबे, तसेच महेश मांढरे, संतोष येलपूलवार, रवी ढेंगळे, समीक्षा भोंगळे, राहुल ठाकरे आदींनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

महत्वाच्या बातम्या

‘त्या’ माजी खासदाराने शिर्डी संस्थानचे पद सोडावे

संभाजी मालिकेवर आक्षेप घेणारा शिवभक्त असू शकत नाही- अमोल कोल्हे

‘काँग्रेस’ला मोठा धक्का ; मोदींचा कट्टर विरोधक ‘भाजप’च्या वाटेवर 

…म्हणून आपल्या प्रत्येक ट्विटला ‘बिग बी’ देतात नंबर

केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !