महिलांविषयी धक्कादायक खुलासा ! ‘डेटिंग अ‍ॅप’ वर 100 पैकी फक्त 4 प्रोफाइलला करतात ‘राईट स्वाइप’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सहसा पुरुष तक्रार करतात की डेटिंग अ‍ॅपवर जास्तीत जास्त लोकांच्या प्रोफाइलला ‘राइट स्पाइप’ केल्यानंतरही त्यांना ‘मॅच’ मिळत नाही. डेटिंग अ‍ॅप क्वैकक्वैकच्या एका अंतर्गत सर्वेक्षणात हे रहस्य समोर आले आहे. लॉकडाऊन दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात कंपनीला आढळले की डेटिंग अ‍ॅपवरील प्रत्येक 100 पैकी फक्त 4 प्रोफाइललाच महिला राइट स्वाइप करतात. तर पुरुष 100 पैकी सरासरी 35 प्रोफाइल राइट स्वाइप करतात.

‘टिंडर’ ला दिले जाते ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपच्या प्रारंभाचे श्रेय

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप जगात ‘मॅच’ चा अर्थ एखाद्याशी कनेक्ट होणे असा होतो. तर ‘राइट स्वाइप’ म्हणजे एखाद्याला पसंत करणे आणि ‘लेफ्ट स्वाइप’ म्हणजे एखाद्याला नापसंत करणे. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपच्या सुरुवातीचे श्रेय ‘टिंडर’ ला दिले जाते. डेटिंग अ‍ॅप एखाद्या वापरकर्त्याच्या फोनच्या लोकेशनच्या आधारावर काम करणारे एक प्रकारचे सोशल नेटवर्किंग अ‍ॅप आहे. यात जेव्हा कोणतेही दोन लोक एकमेकांना उजवीकडे स्वाइप करतात तेव्हा ते ‘मॅच’ होतात. त्यानंतर ते आपापसात गप्पा मारू शकतात.

पुरुष सहसा 10 लोकांशी गप्पा मारतात

या सर्वेक्षणात महिला आणि पुरुष यांच्या गप्पांच्या सवयींचे विश्लेषण देखील करण्यात आले आहे. सामान्यत: पुरुष 10 लोकांसह गप्पा मारतात, तर स्त्रियांमध्ये ते सरासरी 25 लोक असतात. इतकेच नाही तर हे डेटिंग अ‍ॅप वापरणारे 60 टक्के लोक त्यांच्या स्वत:च्या फोटोंसह स्वत:ची प्रोफाइल (खाते उघडणे) तयार करतात तर 40 टक्के लोकांना यात समाधान वाटत नाही.

महिला त्यांचे डेटिंग अ‍ॅप दिवसातून 26 वेळा पाहतात

क्वैकक्वैकच्या मते, महिला त्यांच्या डेटिंग अ‍ॅपला दिवसातून सरासरी 26 वेळा पाहतात, तर पुरुष सरासरी 20 वेळा पाहतात. क्वैकक्वैक डेटिंगची इच्छा असणाऱ्या भारतीयांसाठी तयार करण्यात आलेले एक अ‍ॅप आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की आतापर्यंत 90 लाखाहून अधिक भारतीयांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. हे करण्यासाठी कंपनीला केवळ 97 दिवस लागले.