Women’s IPL : ‘या’ खेळाडूंकडे असणार संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा ६ ते ११ या कालावधीत आयोजित केली आहे. तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून हरमनप्रीत, स्मृती मानधना आणि मिताली राज करणार आहे.

मिनी आयपीएल स्पर्धा सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी या तीन संघांमध्ये खेळली जाणार असून यात भारत व जगातील अव्वल महिला क्रिकेटपटू सहभाग घेणार आहेत. प्रत्येक संघात ४ परदेशी महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीत ही सुपरनोव्हाज संघाची, स्मृती ट्रेलब्लेझर्स संघाची तर मिताली राज ही व्हेलॉसिटी संघाची कर्णधार असणार आहे. तसेच डब्ल्यूव्ही रमण हे सुपरनोवा संघाचे, बीजू जॉर्ज ट्रेलब्लेझर्सचे आणि ममता माबेन या वेलोसिटी संघाचे प्रशिक्षक असतील. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील.

संघ –

सुपरनोवा – हरमनप्रीत कौर (कर्णधार), अनुजा पाटील, अरुंधती रेड्डी, चमेरी अथापथु (श्रीलंका), जेमिमा रोड्रिगेज, ली ताहुहु (न्यूझीलंड), मानसी जोशी, नताली सायव्हर (इंग्लंड), पूनम यादव, प्रिया पुनिया, राधा पी यादव, सोफी डिवाईन (न्यूझीलंड), तानिया भाटिया (यष्टीरक्षक).

ट्रेलब्लेझर्स -स्मृती मानधना (कर्णधार), भारती फुल्मली, दयालन हेमलता, दिप्ती शर्मा, हरलीन देवोल, जसिया अख्तर, झुलन गोस्वामी, आर कल्पना (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, शाकिरा सेल्मन (वेस्टइंडीज), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), स्टॅफनी टेलर (वेस्ट इंडिज), सुजी बेट्स (न्यूझीलंड).

वेलोसिटी – मिताली राज (कर्णधार), अमेलिया केर (न्यूझीलंड), डॅनिएल वॅट (इंग्लंड), देविका वैद्य, एकता बिष्त, हेले मॅथ्यूज (वेस्टइंडीज), जहानारा आलम (बांग्लादेश), कोमल झांझाड, शाफाली वर्मा, शिखा पांडे, सुष्मा वर्मा (यष्टीरक्षक), सुश्री दिव्यदर्षणी, वेदा कृष्णमूर्ती

स्पर्धेचे वेळापत्रक –

६ मे – सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स
८ मे – ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी
९ मे – सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी
११ मे – अंतिम सामना