‘ही’ बनली जगातील सर्वात महागडी ‘नवरी’, पण वास्तव वेगळच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलेच्या आकाराचा जगातील सर्वात मोठा आणि महागडा केक बनवण्यात आला असून दुबईच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे. हा केक ब्रिटनवरून आणण्यात आला असून नवरीच्या वेशभूषेतील असेलला हा पुतळा केक आहे. याची किंमत सात कोटी रुपये असून जगातील सर्वात महागडा केक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या केकचे वजन 120 किलो असून दुबईच्या वर्ल्ड ट्रेडमध्ये ठेवण्यात आलेल्या या केकचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तीन कॅरेटचे हिरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर याला सजवण्यासाठी मोत्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. या केकची लांबी 182 सेंटीमीटर असून हा केक बनवण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला आहे. यावर 5000 फुलांचा देखील वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 1 हजार अंडे, 20 किलो चॉकलेट देखील केक बनवण्यासाठी वापरण्यात आले आहे.

दरम्यान, या पुतळ्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक करत असून काहीजण या केकला जगतातील सर्वात महागडी नवरी असल्याचे म्हणत आहेत.

Visit : Policenama.com