‘रेसलर’ बबीता फोगाटनं साधला राहुल गांधींवर ‘निशाणा’, काँग्रेसचे ‘हे’ माजी आमदार करू लागले ट्विटरवर ‘कुस्ती’ !

पोलिसनामा ऑनलाइन –ओलंपियन आणि भारतीय महिला पैलवान बबीता फोगाट आणि फरीदाबादच्या तिगांव विधानसभेचे माजी आमदार काँग्रेस नेते लिलित नागर यांच्यात राहुल गांधी यांच्यावरून ट्विटर वॉर सुरू झालं आहे. बबीतानं जेव्हा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरंसबद्दल ट्विट केलं होतं. यानंतर हा सगळा वाद सुरू झाला. ती म्हणाली होती की, राहुल गांधी नेमकं काय बोलले, कोणाला समजलं तर प्लीज सांगा.

यानंतर माजी आमदार ललित यांनी बबीताच्या ट्विटला उत्तर दिलं. ते म्हणाले, “ही तुमची लाईन नाही. तुमची लाईन पैलवानकीची आहे का जबरदस्तीनं राजकारण करत आहात. तेच काम करायला हव जे समजतं.”

या ट्विटनंतर बबीतानंही उत्तर दिलं. ती म्हणाली, “ललित जी तुम्ही हीच गोष्ट राहुल गांधी यांना का नाही समजावून सांगत.” या ट्विटनंतर आता भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्येही चांगलीच जुंपली आहे.

बबीता आणि ललित यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशात अनेक युजर्स आता यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.